Nashik | ढगाळ वातावरणाने वाढला उकाडा

Temperature increased by cloudy weather Nashik News
Temperature increased by cloudy weather Nashik Newsesakal
Updated on

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून उन्‍हाळ्याचा तडाखा जाणवत असताना, रविवारी (ता. २४) नाशिककरांनी ढगाळ वातावरणाची अनुभूती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्‍याने उन्‍हाच्‍या झळा सौम्‍य झाल्या. मात्र, उकाडा वाढल्‍याने नाशिककरांना पंखा, कुलर, एसीचा आधार घेत सुट्टीचा दिवस घालवावा लागला.

यंदा एप्रिलमध्ये पाऱ्याने ४० ओलांडली असताना, उन्‍हाळ्याच्‍या झळा जाणवू लागल्‍या होत्‍या. दिवसा रस्‍त्‍यावर शुकशुकाट बघायला मिळत होता. सूर्याच्‍या तप्त किरणांमुळे जनजीवन प्रभावित होत आहे. अशात राज्‍यात अवकाळीचा इशारा हवामान खात्‍याने दिला असताना, रविवारी शहरी भागात दिवसभर ढगाळ वातावरण (Couldy weather) राहिले. सकाळी दहाच्‍या सुमारास काही ठिकाणी अगदी सौम्‍य स्‍वरूपात अवकाळीच्‍या सरी बरसल्‍या. सोसाट्याचा वारा सुटल्‍याने तेवढ्यापुरता नाशिककरांना दिलासा मिळाला. मात्र, नंतर दिवसभर ढगाळ वातावरणामुळे कमालीचा उकाडा जाणवत होता. अशा परिस्‍थितीत पंखे, कुलर व एसीसारख्या साधनांचा उपयोग करून घेत काही प्रमाणात दिलासा मिळविण्याचा प्रयत्‍न नागरिकांनी केला.

Temperature increased by cloudy weather Nashik News
पक्षांसाठी धावली खाकी; कृत्रिम घरट्यांसह केली दाणापाण्याची सोय

किमान तापमान वीसच्‍या पुढे

कमाल वातावरणात वाढ होत असताना, नाशिकच्‍या किमान तापमानातही वाढ नोंदविली गेली. रविवारी नाशिकचे किमान तापमान (Minimum Temperature) २४ अंश सेल्‍सीयस, तर कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस होते. गेल्‍या काही दिवसांपासून किमान तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.

Temperature increased by cloudy weather Nashik News
स्‍कीमच्‍या नावाने फसवणूक; व्‍हॉट्‌सॲप हॅकच्या घटनांमध्ये वाढ

गेल्‍या आठवड्याभरातील वातावरणाची स्‍थिती

(तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

तारीख किमान कमाल

१७ एप्रिल १८.४ ३७.५

१८ एप्रिल १८.७ ३७.५

१९ एप्रिल २०.० ३८.१

२० एप्रिल २३.३ ३७.०

२१ एप्रिल २५.८ ३६.०

२२ एप्रिल -- ३८.८

२३ एप्रिल २२.४ ४०.२

२४ एप्रिल २४.० ३८.९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.