Success Story : टेम्पोचालकाच्या मुलाची नोकरीसाठी परदेशवारी

Tempo drivers son goes abroad for job
Tempo drivers son goes abroad for job esakal
Updated on

विंचूर (जि. नाशिक) : विदेशात नोकरी (Abroad Job) करणे म्हणजे भारतात अभिमानाची गोष्ट समजली जाते. त्यामुळे परदेशी नोकरीला जाण्याची ओढ अनेकांना असते. परिस्थितीअभावी अनेकांचे ते स्वप्नच राहते. पण या सगळ्या समस्यांवर मात करत ते स्वप्न साकराण्याची किमया विष्णूनगर येथील टेम्पोचालकाच्या मुलाने करून दाखविली आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर परदेशात नोकरीसाठी तो गेला असून गावासह परिसरातून त्याचे कौतुक होत आहे.

विष्णूनगर येथील टेम्पोचालक रोहिदास घायाळ यांनी संपूर्ण आयुष्य गाडीचालक म्हणून तसेच पत्नी शोभा हिने शेतात मजुरी करुन कुटुंबाची गुजराण करण्यात घालविले. मुलांचे पदविकेपर्यंत (Diploma) शिक्षण पूर्ण केले. मोठा मुलगा देशसेवेसाठी भरती झाला. छोटा सचिनचे यांत्रिकी अभियांत्रिकीचे (mechanical engineering) शिक्षण झाले होते. घरची परिस्थितीती हलाखीची असल्याने सचिनने नाशिक येथे एका खासगी कंपनीत काम करत पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने राष्ट्रीय स्तरावरील डिझाइन कोर्सचे शिक्षण घेतले. शिकण्याची इच्छा आणि परदेशी जाण्याची संधी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

Tempo drivers son goes abroad for job
Success Story डॉक्टर मित्र रमले दूध उद्योगात...

विष्णूनगर येथील विकास शिंदे हा मुलगा पोलंड (poland) येथे नोकरीसाठी आहे. सचिन त्याच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत स्वप्न साकारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. अखेर त्याच्याच मदतीने पोलंड येथील 'इ सेल प्रोपॅक लि.' नामांकित कंपनीत त्याची गुणवत्तेवर निवड झाली. दोन दिवसापूर्वीच तो पोलंडला रवाना झाला. यावेळी त्याला नातेवाईक, मित्र, परिवार गाव, परिसरातील नागरिकांनी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

Tempo drivers son goes abroad for job
Success Story : निरक्षर दांपत्याचा मुलगा बनला 'CA'

"भारतातील तरूणांचे परदेशात नोकरीचे प्रमाण जगाच्या तुलनेत खूपच कमी आहे. परदेशात नोकरीच्या खूप संधी आहेत. त्यामुळे इतर देशातील तरूणांसारखे भारतातील तरुणांनी संधीचा फायदा घ्यावा."

- विकास शिंदे, पोलंड

"आमची हालाखीची परिस्थितीती असतांनाही सचिनने इच्छाशक्तीच्या जोरावर तसेच विकासचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने तो स्वप्न साकारू शकला. याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. इतर मुलांनी याची प्रेरणा घ्यावी."

-रोहिदास घायाळ, विष्णूनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()