Nashik News: गंगापूर धरण जलवाहिनीसाठी निविदा समितीची स्थापना

Gangapur dam
Gangapur damesakal
Updated on

Nashik News : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण दरम्यान साडेबारा किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे.

जलवाहिनी टाकण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी निविदा समिती स्थापन केली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. (Tender committee set up for Gangapur Dam Canal Nashik News)

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून कच्चे पाणी वाहून नेणारी साडेबारा किलोमीटरची बाराशे व्यासाची सिमेंटची जलवाहिनी आहे.

सिमेंट जलवाहिनीची वहन क्षमता कमी होण्याबरोबरच वांरवार गळती होत असल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद करावा लागतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gangapur dam
Nashik Teacher Protest: माध्यमिक शिक्षकांचे उद्या धरणे आंदोलन

त्यामुळे नवीन जलवाहिनीसाठी महापालिकेने केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली. केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळाली. प्रकल्पासाठी २०४ कोटी ३८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी अध्यक्ष, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, प्रभारी मुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे समितीच्या सदस्य व पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर समितीचे सदस्य सचिव आहेत.

Gangapur dam
Nashik News: उच्चदाब वीजतारांमुळे भीतीचे सावट! अनेक वर्षापासून प्रश्‍न रखडला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.