Nashik News: थेट गंगापूर जलवाहिनीसाठी निविदा प्रक्रिया

Gangapur Dam File Photo
Gangapur Dam File Photoesakal
Updated on

Nashik News : गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जवळपास साडेबारा किलोमीटर लांबीची नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, २० डिसेंबरपर्यंत मुदत आहे.

त्यामुळे जानेवारीत काम सुरू होऊन पाणी गळतीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. (Tender Process for Direct Gangapur Aqueduct Nashik News)

गंगापूर धरणातून कच्च्या स्वरूपात पाणी उचलले जाते. कच्च्या स्वरूपात उचललेले पाणी बारा बंगला व शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचविले जाते. तेथे शुद्धीकरणाची प्रक्रिया होऊन पुढे जलकुंभाच्या माध्यमातून घरोघरी पाणी पोचते.

१९९७ ते २००० या कालावधी मध्ये २०२१ मधील अंदाजित लोकसंख्या लक्षात घेऊन गंगापूर, तर बारा बंगला दरम्यान १२०० मिलिमीटर व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकल्या.

२३ वर्षात जलवाहिनीची वहन क्षमता घटली. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने दुरुस्तीचे काम करावे लागते.

Gangapur Dam File Photo
NMC News: शहर समन्वयकास मिळणार मुदतवाढ

यामुळे वांरवार पाणीपुरवठा खंडित करावा लागत असल्याने गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची १२.५० किलोमीटर लांबीची १८०० मिलिमीटर व्यासाची नवी लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून निधी मंजूर झाला. प्रकल्पासाठी २०४.३८ कोटींचा खर्च लागणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर सल्लागारांच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला.

प्राधिकरणाच्या तांत्रिक मान्यतेनंतर समितीने निविदा प्रसिद्ध केल्या. दरम्यान निविदेनंतर कार्यारंभ आदेश देवून कामाला सुरवात होणार आहे. जलवाहिनीमुळे २०५५ पर्यंतचा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.

Gangapur Dam File Photo
NMC Smart School: डिजिटल शिक्षणासाठी मनपा विद्यार्थी सज्ज; स्मार्ट स्कूल प्रकल्पाचे दिवाळीनंतर उद्‌घाटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.