NMC News : महापालिकेच्या 400 सुरक्षारक्षकांना मुदतवाढ

महापालिका मुख्यालयासह विविध मालमत्तांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या ४०० सुरक्षारक्षकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
nmc
nmcesakal
Updated on

NMC News : महापालिका मुख्यालयासह विविध मालमत्तांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या ४०० सुरक्षारक्षकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुरक्षा रक्षकांसाठी ११.७५ कोटी रुपयांचा खर्चाचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. (Term extension for 400 security guards of Municipal Corporation nashik news)

महापालिकेत विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. तशीच कमतरता सुरक्षा रक्षक विभागातदेखील आहे. आस्थापना खर्चाची मर्यादा वाढल्याने नोकर भरतीला परवानगी मिळत नाही. त्यामुळे १० नोव्हेंबर २०२० च्या ठरावानुसार महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयासह रुग्णालय व विभागीय कार्यालयांच्या सुरक्षेसाठी नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या ४४१ सुरक्षा रक्षकांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या सुरक्षा रक्षकांची मुदत संपुष्टात आली होती. त्यानंतर महापालिकेने सुरक्षारक्षक मंडळाकडे सेवा वर्ग करण्यासाठी पत्र दिले होते. या विरोधात सुरक्षा रक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली व महापालिकेच्या कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सुरक्षा रक्षकांना पुढील निर्णय होईपर्यंत त्यांची सेवा वर्ग करू नये, असे आदेशित केले होते.

nmc
NMC News: खाते प्रमुखांना 2 जानेवारीचा अल्टिमेटम

त्यानुसार महापालिकेने २० मार्च २०२३ रोजी केलेल्या महासभेच्या ठरावानुसार २६९ पुरुष व दहा महिला सुरक्षा रक्षकांना ५ डिसेंबर २०२२ ते ४ डिसेंबर २०२३ पर्यंत तर ९० महिला व ४१ पुरुष सुरक्षा रक्षकांना १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत महत्त्व देण्याचा निर्णय घेतला होता. सदरची मुदतवाढ संपुष्टात आली. त्यामुळे न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार अंतिम निर्णय होईपर्यंत सुरक्षारक्षकांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला.

२५९ पुरुष व दहा महिला सुरक्षा रक्षकांना पाच डिसेंबर २०२३ ते ४ डिसेंबर २०२४ पर्यंत व ९० महिला व ४१ पुरुष सुरक्षा रक्षकांना १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढीचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरील निर्देशानुसार महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये तैनात असलेल्या नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडील ४०० सुरक्षा रक्षकांना दुसऱ्यांदा वर्षभराची मुदतवाढ दिली जाणार आहे. यासाठी ११.७५ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली.

nmc
NMC News : नाश्त्याच्या पाकिटांचे वाटप अन्‌ लागलीच स्वच्छता; महापालिकेच्या स्वच्छता विभागाने घेतली विशेष काळजी

सुरक्षा रक्षकांवरील वार्षिक खर्च

प्रति सुरक्षा रक्षकासाठी येणारा दरमहा खर्च- २२,२५५

महागाई भत्ता वाढ(एक वर्षाकरिता)- २,२२५

प्रतिमाह सुरक्षा रक्षकांचा एकूण खर्च- २४,४८०

प्रति सुरक्षा रक्षकावरील वार्षिक खर्च- २,९३,७६०

४०० सुरक्षा रक्षकांसाठी दरमहा खर्च- ९७,९२,०००

४०० सुरक्षा रक्षकांसाठी वार्षिक खर्च- ११,७५,०४,०००

nmc
NMC News : शहरात 7 वाहनतळ विकसित होणार! महापालिकाच सोडविणार प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()