इगतपुरी (जि. नाशिक) : गेल्या तीन वर्षांपासून विविधांगी कारणांमुळे लांबणीवर पडलेली व बहुचर्चित आणि डीएड, बीएड पात्रताधारक शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता पात्रता चाचणी (टेट) मागील आठवड्यापासून सुरू झाली.
मात्र ही परीक्षा देणाऱ्या भावी गुरुजींना पेपरमधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांनी घाम फोडला. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ तर समाज शास्त्रातील प्रश्न अतिशय किचकट असल्याचे परीक्षार्थींनी सांगत आहेत.
तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी २० ते ३० टक्के प्रश्न सोडविलेलेच नसल्याची माहिती पुढे येत आहे. (TET exam candidates get complicated questions during paper 120 minutes insufficient for 200 marks nashik news)
राज्यातील शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र’ पोर्टलद्वारे भरती प्रक्रियेचे आयोजन केले जाणार असून, त्यासाठी टेट घेतली जाते. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाइन टेस्ट राज्यभरात घेण्यात येत आहे. ३ मार्चला ही परिक्षा संपणार असून लगेच येत्या आठवडाभरात या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
परिक्षेसाठी अल्प अवधी
आजपर्यंत परीक्षा देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपर अतिशय अवघड गेल्याचे एकमेकांना सांगत आहेत. २०० गुणांच्या पेपरसाठी १२० मिनिटांची मिळालेला अवधी अत्यंत अपुरा असल्याचे या परीक्षार्थी सांगतात.
अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांवर या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्न समजावून घेऊन सोडविण्यासाठीच वेळ अपुरा पडल्याचे मत परीक्षार्थींनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे किचकट भाषेत प्रश्न विचारल्यामुळे ते समजण्यात अधिक कालावधी गेल्याचेही या विद्यार्थ्यांनी सांगितले.
उमेदवारांचे लक्ष निकालाकडे
राज्यभरातील अडीच लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून, आयबीपीएस या संस्थेकडे संबंधित परीक्षेचे कंत्राट देण्यात आले आहे. मागील ‘टीईटी’ परीक्षेत गैरमार्गाने प्रमाणपत्रे मिळविल्याचा प्रकार गेल्या वर्षी पुढे आला होता. त्यामध्ये परीक्षा परिषदेतील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फळ भोगावे लागले आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
परिक्षा संपल्यावर येत्या आठवडाभरात टेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने व मागील परिक्षेत घसरलेल्या निकालाची पार्श्वभूमी लक्षात यंदा निकाल किती लागतो. या बाबीकडे परीक्षार्थी उमेदवारांसह शिक्षण क्षेत्राचे विशेष लक्ष लागून आहे.
परीक्षार्थी म्हणतात...
"इंग्रजी, बालमानस शास्त्रावरील प्रश्न कठीण होते. गणिताच्या काही प्रश्नांमध्ये मागील प्रश्नपात्रिकांमधील प्रश्नांशी साधर्म्य होते. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ लागला. परिक्षेत विचार प्रवर्तक प्रश्नांचा अधिक भरणा असल्याने वेळ अपुरा पडला." - गीता पाटील
"पहिला पेपर बरा गेला. इतिहास, सामाजिकशास्त्रे या विषयांवरील प्रश्नही किचकट स्वरूपाचे होते. परिक्षेत इयत्ता आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमांवरील प्रश्न येणे अपेक्षित होते. मात्र त्याबाहेरील प्रश्न होते. त्यामुळे एवढा अभ्यास करूनही ऐनवेळी अंदाज व्यक्त करावा लागला."
- पूजा माळी
"इंग्रजी विषयाच्या प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक होती.पूर्वी इंग्रजीतील परिच्छेदावरील प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये होती.यावेळचे पेपर तसे नव्हते. उत्तरे लिहिताना अधिक विचार करायला लागला.त्यामुळे वेळ खुपच कमी मिळतो आहे." - विशाखा गोडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.