Salim Kutta Case: ठाकरे गटाकडून राणेंचा पुतळा दहनाचा प्रयत्न

Police officers, staff while taking over the symbolic statue of MLA Nitesh Rane.
Police officers, staff while taking over the symbolic statue of MLA Nitesh Rane. esakal
Updated on

Salim Kutta Case : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर झालेल्या आरोपांचा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध करण्यात आला.

शालिमार येथील कार्यालयाबाहेर आमदार नीतेश राणे यांचा प्रतीकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी तो हाणून पाडत ताब्यात घेतला. (Thackeray group attempts to burn symbolic statue of Rane nashik news)

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी श्री. बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप नीतेश राणे यांनी अधिवेशनात केला. राज्यभरात यासंदर्भातील व्हिडिओ प्रसारित झाला. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांचा निषेध व्यक्त करीत त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली.

सुधाकर बडगुजर यांच्यावर केलेले आरोप राजकीय आकाशापोटी केले असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगत नीतेश राणे यांचा निषेध व्यक्त केला. शुक्रवारी (ता. १५) शालिमार येथील कार्यालयाबाहेर राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न झाला.

Police officers, staff while taking over the symbolic statue of MLA Nitesh Rane.
Sudhakar Badgujar: बडगुजरांसह अन्‍य तिघांची चौकशी; गुन्‍हे शाखेकडून कारवाई

भद्रकली पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथक तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी पुतळा दहन करण्यास मज्जाव केला. पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच आंदोलनकर्ते यांनी पुतळ्याची ओढाताण केली. शेवटी पोलिसांनी पुतळा आणि छायाचित्र ताब्यात घेतले. आंदोलनकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. संजय परदेशी, इम्रान तांबोळी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Police officers, staff while taking over the symbolic statue of MLA Nitesh Rane.
Salim Kutta: "इक्बाल मिर्चीशी कनेक्शन असलेले सोबत बसलेत"; सलिम कुत्ताच्या प्रकरणावरुन काँग्रेसचा भाजपला टोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.