Nashik News : पाणी कपातीला ठाकरे सेनेचा विरोध; महानगरप्रमुख बडगुजर यांचा आंदोलनाचा इशारा

Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujaresakal
Updated on

Nashik News : दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ‘अल निनो’ वादळाच्या शक्यतेमुळे यंदा पावसाळा लांबणार असल्याने महापालिका प्रशासनाने पाणी कपातीचे नियोजन केले आहे. मात्र प्रशासनाच्या या भूमिकेला शिवसेनेच्या ठाकरे गटाने कडाडून विरोध केला असून, धरणात ५४ टक्के पाणीसाठा असताना नागरिकांना घाबरवण्याचे कारण नाही.

पाणीकपात झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (Thackeray Sena opposes water cut Metropolitan Mayor Badgujars warning of agitation Nashik News)

नाशिक महापालिकेने नगर विकास विभागाला अहवाल सादर केला आहे. त्यात ३१ ऑगस्टपर्यंत पाणी साठा जपून वापरण्यासाठी नियोजन आहे. एप्रिल व मे महिन्यात हप्त्यातून एकदा, तर जून महिन्यापासून हप्त्यातून दोनदा पाणी कपात करण्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार मंगळवारी (ता. ११) राज्य शासनाकडे बैठक होईल.

त्यानंतर निर्णय घेतला जाईल मात्र त्यापूर्वी पाणी कपातीला सेनेच्या ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी सादर करत कपातीला विरोध केला असून, सदर कपात नाशिककरांवर अन्याय करणारी ठरेल असा दावा केला. कपात केल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Sudhakar Badgujar
Unseasonal Rain Nashik : पावसामुळे नाशिक तालुक्यात दाणादाण; द्राक्ष, गहू पिकांचे नुकसान

धरणात ५४ टक्के साठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रामुख्याने गंगापूर धरणात ५४ टक्के पाणीसाठा आहे. ६१२ मीटर पाण्याची पातळी आहे, तर पाण्याचा डेड साठादेखील मोठा आहे. अशा परिस्थितीमध्ये पाणी कपात करणे योग्य होणार नाही.

सिडको व जुने नाशिकमध्ये पाणी साठवण्याची क्षमता कुटुंबांकडे नाही. अशा परिस्थितीमध्ये तेथे पाणी कपातीचा मोठा परिणाम होईल. मुळात धरणामध्ये भरपूर पाणीसाठा आहे. धरणातच पाणी कमी असते, तर कपातीला हरकत घेण्याचे कारण नव्हते.

त्यामुळे प्रशासनाने सध्या सुरू असलेल्या पाणी पुरवठ्यानुसारच नियोजन करावे कपात केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असे बडगुजर यांनी सांगितले.

"एक दिवस पाणी कपात केल्यास त्याचा परिणाम पुढील तीन दिवस होतो. धरणात पाणीसाठाच कमी आहे, अशी ही परिस्थिती नाही. धरणातील पाणी पातळीदेखील समाधानकारक आहे. त्यामुळे पाणीकपात करणे योग्य नाही. नागरिकांना प्रशासन घाबरून सोडत आहे. पाणीसाठ्याचा विचार करून कपात होऊ देणार नाही."

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना.

Sudhakar Badgujar
Dogs Sterilization : वर्षभरात सव्वानऊ हजार श्वानांचे निर्बीजीकरण; 60 लाखांहून अधिक खर्च

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()