‘आमदार आपल्या दारी’ मोहिमेचा पहिला टप्पा मनमाडपासून

suhas kande
suhas kandeesakal
Updated on

नांदगाव (जि. नाशिक) : आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांच्या संकल्पनेतून तसेच, शिवसेना व अंगीकृत संघटना यांच्या सांघिक प्रयत्नातून शिवसेना (Shiv Sena) ‘आमदार आपल्या दारी’ या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील नियोजन जाहीर करण्यात आले आहे. त्याचा प्रारंभ मनमाडमधील बुरकुलवाडी, माऊली नगर, किर्ती नगर, कोतवाल नगर, सिकंदर नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, तिरंगा नगर, गौतम नगर या भागातील नागरिकांपासून येत्या ६ जूनपासून करण्यात येणार असल्याची माहिती आमदारांच्या संपर्क कार्यालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. (The first phase of MLA at your door campaign from Manmad Nashik News)

लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघातील जनतेच्या अडचणी सातत्याने सोडविण्यास प्राधान्यक्रम देत असताना जनता व आमदार यांच्यामधील दरी कमी व्हावी, तळागाळातील समस्या डोळ्याने पाहणे, समक्ष जनतेला भेटून समजून घेणे या प्रामाणिक उद्देशाने आमदार सुहास कांदे हे ‘आमदार आपल्या दारी’ या मोहिमेंतर्गत घरापर्यंत जाऊन नागरिकांना भेटणार आहेत. त्यांच्या समस्या ऐकून घेणार आहेत आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्वरित प्रयत्न करणार आहेत. या मोहिमेप्रसंगी तहसील, पंचायत समिती, नगरपालिका, मंडळ अधिकारी, महावितरण, भुमिअभिलेख, पोलिस स्टेशन, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, उपजिल्हा रुग्णालय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या व संबंधित अधिकाऱ्यांना समोरासमोर चर्चा घडवून समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.

suhas kande
Nashik : म्हाळदे घरकुल योजनेचे वाजले बारा

नागरिकांनी आपल्या समस्या निसंकोचपणे मांडण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित रहावे, आपल्या समस्यांचे निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल, असे आवाहन आमदार सुहास कांदे यांनी केले आहे.

suhas kande
दैव बलवत्तर म्हणून ओतूरचे चौघे बचावले; कारमधील मोरेंनी सांगितली आपबिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.