मायभूमीकडून मिळालेला सन्मान विशेष मोलाचा: डॉ. धनंजय दातार

मायभूमीकडून मिळालेला सन्मान विशेष मोलाचा: डॉ. धनंजय दातार

दुबईत महाराष्ट्र सरकारतर्फे गौरव
Published on

मुंबई : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही पुरस्कार मिळाले तरी कर्मभूमी दुबईत मायभूमी महाराष्ट्राकडून झालेला सन्मान माझ्यासाठी विशेष मोलाचा आणि जिव्हाळ्याचा आहे. ही शाबासकीची थाप असून त्यामुळे मला मातृभूमीची सेवा करण्यासाठी अधिक चैतन्य मिळेल, असे प्रतिपादन अल अदिल समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच दुबईमध्ये केले. दुबई एक्स्पो २०२० या जागतिक प्रदर्शनानिमित्त आयोजित डॅझलिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात डॉ. दातार यांना महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.

त्यानिमित्त डॉ. दातार बोलत होते. महाराष्ट्राच्या उद्योग तथा पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, भारताचे दुबईतील महावाणिज्य दूत (कॉन्सुल जनरल) डॉ. अमन पुरी यांच्यासह उद्योग-व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. दुबईतील हयात ग्रॅंड हॉटेलमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दुबई येथे सध्या एक्स्पो २०२० हे जागतिक औद्योगिक प्रदर्शन सुरू आहे. त्यात भारताचाही सहभाग असून भारतीय दालनात संस्कृती-विज्ञान-तंत्रज्ञानाचा आविष्कार घडवण्यात आला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून डॅझलिंग महाराष्ट्र सन्मान मराठी मातीचा या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक गुंतवणूकदारांसमवेत बैठका या काळात होत आहेत. दुबईच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे वास्तविक एक्स्पो २०२० प्रदर्शनाचे गेल्या वर्षीच आयोजन करण्यात आले होते, परंतु कोविड १९ साथीच्या जागतिक प्रादुर्भावामुळे ते लांबणीवर पडले आणि यंदा साथीचा धोका कमी झाल्याने आश्वासक वातावरणात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.