Nashik : धोकादायक वाड्यांचा प्रश्न अद्यापही अधांतरीच

old wada
old wadaesakal
Updated on

जुने नाशिक : धोकादायक वाड्यांचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. वर्षानुवर्षे महापालिकेकडून (NMC) केवळ नोटीस बजावण्याचा सोपस्कार केला जात आहे. त्यामुळे अजूनही धोकादायक वाडे जैसे थे परिस्थिती आहे. शहरातील धोकादायक वाड्यांचा (Old Wada) घरांचा प्रश्न अतिशय जटिल झाला आहे. (The issue of dangerous castles is still unresolved Nashik News)

जुने नाशिक, पंचवटी भागात सर्वाधिक जुने वाडे आहे. दरवर्षी पावसाळ्यात यातील बहुतांश वाडे, घरे कोसळण्याच्या घटना घडत असतात. महापालिकेकडून दरवर्षी नियोजनानुसार नोटीस बजावण्याचा सोपस्कार केला जातो. शहरात शेकडो धोकादायक वाडे, घरे आहे. त्यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेणे काळाची गरज आहे. असे असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वाडे कोसळण्याच्या घटना घडून जीवितहानी होण्याची दुर्घटना होते. अद्यापही धोकादायक वाडे, घरांचा प्रश्न अधांतरीच आहे. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेस कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. आजही बहुतांशी नागरिक धोकादायक वाडे, घरांमध्ये वास्तव्यास आहे.

old wada
Nashik : गोदावरी प्रदूषित करण्याऱ्या कंपन्यांविरुद्ध करणार कारवाई

घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादामुळे वाड्यांची दुरुस्ती करता येत नाही. तर, दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांची परिस्थिती जैसे थे राहून अपघातास निमंत्रण मिळत आहे. महापालिका पूर्व विभागाचा विचार केला, तर सध्या ८१ धोकादायक वाडे, घरांची नोंद आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जात आहे. त्यानिमित्ताने महापालिकेकडून पावसाळी पूर्वी कामाचा भाग म्हणून धोकादायक, वाडे घरांना नोटीस बजावण्यात सुरवात केली आहे.

old wada
जाधव पिता-पुत्राच्या मृत्यूचा उलगडा; बापानेच 17 वर्षीय मुलाचा आवळला गळा

पूर्व विभागात नोंद असलेल्या ८१ धोकादायक वाडे घरांपैकी ७२ मिळकतींना नोटीस बजावण्यात आली आहे. उर्वरित सहा मिळकतीचे नूतनीकरण झालेले आहे. तर तीन मिळकती पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहे. महापालिकेकडून पोलिस प्रशासनाची मदत घेत धोकादायक वाडे, घरे दुर्घटना होण्यापूर्वी रिकामे करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. केवळ नोटीस बजावणे उपाय नाही. ठोस कारवाई करणे आवश्यक झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.