The Kerala Story Free Show : सकल हिंदू समाजातर्फे ‘द केरला स्टोरी’ दाखविला मोफत

Sakal Hindu Samaj coordinator showering flowers on women who came to watch the movie 'The Kerala Story' at Movie Max on College Road.
Sakal Hindu Samaj coordinator showering flowers on women who came to watch the movie 'The Kerala Story' at Movie Max on College Road.esakal
Updated on

The Kerala Story Free Show : ‘लवजिहाद’ विषयावर आधारित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. युवती व महिलांनी भगवी टोपी व मफलर परिधान करत कॉलेज रोडवरील मूव्ही मॅक्समध्ये चित्रपट बघितला. या वेळी ‘जय श्रीराम’, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशा घोषणा देण्यात आल्या. (The Kerala Story shown for free by sakal Hindu samaj nashik news)

चित्रपट बघण्यासाठी उपस्थित महिलांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. जास्तीत जास्त महिलांनी हा चित्रपट बघावा आणि आपण कोणासोबत प्रेम करावे,

याची जाणीव करून देण्यासाठी सकल हिंदू समाज संघटनेतर्फे दोनशे महिलांना मोफत तिकीट वाटप करण्यात आले. या वेळी महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हा चित्रपट बघितला. चित्रपटगृहात जाण्यापूर्वी जोरदार घोषणा देत त्यांनी या चित्रपटाचे समर्थन केले.

"चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर लक्षात आले की हा दोन समाजातील प्रथांविषयीचा चित्रपट आहे. त्यातून आमच्यासारख्या मुलींनी काय बोध घ्यायला हवा, यासाठी आज चित्रपट बघायला आले आहे."- कोमल भामरे, प्रेक्षक

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sakal Hindu Samaj coordinator showering flowers on women who came to watch the movie 'The Kerala Story' at Movie Max on College Road.
बाबो! The Kerala Story ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर उडवला धुरळा.. कमावले 'इतके' कोटी..

"चित्रपटातून काहीतरी संदेश दिला जातो. हा संदेश आमच्या जीवनात फार उपयोगी ठरणारा असेल, म्हणून आम्ही चित्रपट बघायला आलो आहोत. चित्रपट बघितल्यानंतर कळेल."

- निर्जरा मुथा, प्रेक्षक

"चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. देशातील जनतेला कळावे की ‘द केरला स्टोरी’ चित्रपटातून सामाजिक वास्तव काय आहे, कशा पद्धतीने लोक वागतात. त्याचा संपूर्ण समाजमनावर गंभीर परिणाम होतो. याचे विचार पटवून देण्यासाठी आम्ही सहपरिवार चित्रपट बघायला आलो आहोत."- डॉ. राखी मुथा

"सामाजिक बांधिलकी आणि हिंदू समाजावर होणारे आक्रमण रोखण्यासाठी हा चित्रपट फार प्रभावी ठरेल. हा चित्रपट बघितल्यानंतर मुली व तरुणींच्या मनावर निश्चितपणे परिणाम होईल, की आपण कुणासोबत प्रेम करत आहोत. त्याचे परिणाम भविष्यात काय होऊ शकतात. त्यासाठी शहराच्या विविध ठिकाणी महिलांना मोफत चित्रपट दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे."

- विनोद थोरात, सकल हिंदू समाज समन्वयक

Sakal Hindu Samaj coordinator showering flowers on women who came to watch the movie 'The Kerala Story' at Movie Max on College Road.
The Kerala Story row:'केरळ स्टोरीला विरोध करणारे दहशतवादी' वादात कंगना संतापली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()