या उमेदवारांना येत्या ५ जुलैला राजभवनात बोलविले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (Maharashtra University of Health Sciences) कुलगुरू (Vice-Chancellor) निवडीची (Selection) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राजभवनाकडून पाच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. राजभवनात ५ जुलैला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) मुलाखत घेतील. याच दिवशी कुलगुरूपदाकरिता नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या नावांमध्ये डॉ. माधुरी कानिटकर, डॉ. अजय चंदनवाले, डॉ. नितीन गंगणे, डॉ. आरती किणीकर, डॉ. दीपक राऊत यांचा समावेश आहे. (the process of selection of vice chancellor of maharashtra university of health sciences is in the final stage)
सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमळकर यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. कुलगुरू निवडीकरिता प्रस्ताव मागविल्यानंतर छाननीनंतर पात्र उमेदवारांची मुलाखत होणार होती. २३ व २४ एप्रिलला नियोजित मुलाखत प्रक्रिया कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे स्थगित केली होती. त्यानंतर या महिन्यात १९ व २० तारखेला मुंबईत उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यानंतर निवड समितीने राजभवनाकडे पाच नावांची यादी शनिवारी (ता.२६) पाठविली. या उमेदवारांना येत्या ५ जुलैला राजभवनात बोलविले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत.
यादीतील पाच नावांत केंद्रीय संरक्षण दलातील इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ विभागातील लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, पुण्यातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयातील विभागप्रमुख डॉ. आरती किनीकर, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातील सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता व संचालक डॉ. नितीन गंगणे यांच्यासह नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग ॲन्ड रिसर्च येथील संचालक प्रा. डॉ. दीपक राऊत यांच्या नावाचा समावेश आहे.(the process of selection of vice chancellor of maharashtra university of health sciences is in the final stage)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.