नाशिक : सहा दिवसांत कोरोना रुग्णवाढीचा वेग तिप्पट

शाळा सुरू की बंद ठेवण्याचा निर्णय होणार चार दिवसांत
Corona Patients
Corona PatientsSakal media
Updated on

नाशिक : शहरात (nashik )सहा दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाल्याने प्रशासन हाय ॲलर्ट मोडवर आले असून, गृह विलगीकरणातील(home quarantine) रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी विभागवार पथके नियुक्त करण्याबरोबरच महाकवच ॲप कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त कैलास जाधव(carporation commisinor kailas jadhav) यांनी दिल्या. त्याचप्रमाणे पंचवटीतील घटनेनंतर शहरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांची(collector of nashik) समिती येत्या चार ते पाच दिवसात घेणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Corona Patients
सिंधूताई सपकाळ : आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गेल्या आठवड्यापासून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. १ ते २७ डिसेंबर या कालावधीत २८ रुग्ण होते. तीन जानेवारीपर्यंत सरासरी प्रतिदिन तिप्पट रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची घंटा वाजल्याने प्रशासन सतर्क झाले. गृह अलगीकरणात असलेल्या ८८ नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात एक याप्रमाणे सहा स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृहविलगीकरणाची व्यवस्था नसल्यास बिटको किंवा डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. कोरोना बाधित रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी महाकवच अॅप कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी वैद्यकीय विभागाला दिले. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग करून त्यांच्या स्वॅब चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

Corona Patients
युतीचा पूल बांधणे गडकरींना शक्य : अब्दुल सत्तार

बावीस रुग्ण व्हेंटिलेटरवर

वैद्यकीय विभागाच्या अहवालानुसार सद्यःस्थितीत शहरात कोरोनाचे ५४८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील ६६ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यातही बावीस रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. अठरा रुग्णांना प्राणवायूची आवश्‍यकता आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या मोबाईलमध्ये महाकवच ॲप डाऊनलोड केले जाणार आहे. जेणेकरून रुग्णाच्या हालचालींची नोंद महाकवच ॲपवर होईल.

Corona Patients
साडेचार कोटींच्या निधीला कराड पालिका मुकली

निर्णय आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत

पंचवटीतील दंत महाविद्यालयात २७ मुली कोरोना बाधित आढळल्यानंतर शहरातील शाळा सुरू ठेवण्याबाबतच निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखालील आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेतला जाईल. साधारण चार ते पाच दिवसात शाळा सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.