इंधनावरील कर कपातीची घोषणा हवेतच

fuel rate
fuel rateesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (नाशिक) : इंधनाच्या दरावरून हलकल्लोळ उडाला असून, वर्षभरापासून राजकीय आखड्यात भडका उडाला आहे. केंद्रामुळे पेट्रोल-डिझेल महाग झाल्याचा राज्य सरकारचा आरोप आहे, तर भाजपप्रणीत राज्यात कमी दर असल्याकडेकेंद्र सरकार व भाजपसमर्थक बोट दाखवितात. दरम्यान, केद्र सरकारने उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय घेतला आणि पेट्रोल व डिझेल स्वतही झाले. पण, राज्य सरकारचा पेट्रोल- डिझेलवरील व्हॅट(मूल्यवर्धित कर) कपातीची घोषणा अद्याप हवेतच आहे. पिंपळगांव बसवंतसह नाशिक जिल्ह्यात या निर्णयाची अद्याप अमंलबजावणी नसल्याने आहे, त्या भावातच ग्राहकांना पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. घोषणेला चार दिवसांचा कालावधी होऊनही या घोषणा कधी अमलात येते, याची प्रतीक्षा आहे.

महागाईच्या झळा दिवसेदिवस तीव्र होत आहेत. इंधनासह सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल,डिझेल व गॅसच्या दरवाढीचा सिलसिला तर दोन वर्षापासून सुरूच आहे. राज्य सरकारच्या व्हॅट कपात करण्याच्या घोषणेनंतर पेट्रोलचा प्रतिलिटर दर ११० रुपये, तर डिझेलचा दर ९६ रुपये होणे अपेक्षित होते. पण चार दिवसांनंतरही याची अमंलबजावणी झाली नाही. व्हॅट कपातीनंतर अद्याप काही सूचनाच आलेली नाही. महागाईबाबत केद्रांच्या नावाने बोटे मोडणाऱ्या राज्य सरकार व त्यांच्या समर्थकांची या निर्णयाबाबत चुप्पीच आहे. केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्क कपातीचा परिणाम लगेच दिसला. मात्र, राज्य सरकारचे घोडे नेमके कुठे अडले, हे कळायला मार्ग नाही. राज्य सरकारच्या व्हॅट कपातीनंतर अशी कुठलीही सूचना आलेली नाही. त्यामुळे इंधनाचे दर दोन दिवसांपासून स्थिर आहेत, असे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे.

fuel rate
Petrol Diesel: पाकिस्तानमध्ये इंधनदराचा भडका; अचानक ३० रुपयांची वाढ

२१ मेच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात घट

महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने शनिवारी (ता. २१) मध्यरात्रीपासून पेट्रोल- डिझेलचे दर घटले. त्यामुळे पूर्वी १२१ रुपये लिटने भरावे लागणारे पेट्रोल रविवार (ता. २२)पासून १११ रुपये प्रतिलिटरने मिळू लागले, तर डिझेलसाठी लिटरला १०४ रुपये मोजावे लागायचे ते आता ९७ रुपयापर्यत खाली आले आहे. केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्क कपातीमुळे पेट्रोल दरात प्रतिलिटर आठने, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर सात रुपयांनी घट झाली. दरम्यान,महागाईबाबत कायम केद्रांकडे बोट दाखविणाऱ्या राज्य सरकारनेही रविवारीच पेट्रोल- डिझेलवरील व्हॅटमध्ये कपातीची घोषणा केली. त्यामुळे सोमवारपासून पेट्रोल दोन रुपयाने, तर डिझेल दीड रुपयाने स्वस्त होणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात गुरुवारही राज्य सरकारच्या घोषणा व निर्णयाची अमंलबजावणी झाली नाही.

fuel rate
मोदी आणि ठाकरे सरकारची इंधन करकपात : जनतेचा फायदा होणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.