पिंपळगावात चोरांना ‘मोकळे रान‘; नागरिक कमालीचे धास्तावले

crime
crimesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : शहरातील उंबरखेड रस्त्यावरील गजबजलेल्या नागरी वस्तीत एकाच महिन्यात भरदिवसा चार घरफोड्या झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. चोरट्यांनी दिवाळीच्या सुटीपूर्वीच ही सलामी दिल्याने चार घरामध्ये सुमारे दहा लाख रुपयांचा हात मारला आहे. दिवसाढवळ्या ऐवज लुटून नेत असताना एकाही चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. चोरट्यांना पोलिसाचा धाकच उरलेला नाही. चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने चोरट्यांनो, या पिंपळगावात आपले स्वागत आहे...एवढा फलकच लावायचे आता शिल्लक राहिले आहे. घरफोडीबरोबरच टोळी युद्धाने पिंपळगावची शांतता भंग पावली आहे.

पिपळगावचा उंबरखेड रस्ता परिसर दिवसभर गजबजलेला असतो. पण पोलिस व नागरिकांच्या हातावर तुरी देऊन चोरटे डाव साधत आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त घर बंद करून जाणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवून चोरटे संधी साधत आहेत. चोरट्याचा हा धुमाकूळ रोखण्यासाठी आता पिंपळगाव पोलिसांना सिंघमचा अवतार घ्यावा लागेल अन्यथा दिवाळीत चोरटे धुमाकूळ घालू शकतात. वारंवार होणाऱ्या या घरफोडीने पिंपळगाव पोलिसांचा धाक उरला आहे की नाही अशी स्थिती आहे.

पिंपळगाव शहरातील उंबरखेड रस्त्यावरील नागरवस्तीत महिन्याभरात रणदीप गोसावी, तेजश्री पगार, केशव वखरे, सतीश भदाणे यांच्या घरावर दिवसाढवळ्या डल्ला मारला गेला. संजय झुटे, पुरूषोत्तम बनकर, रवींद्र डोखळे यांनाही चोरांनी झटका दाखविला. गत महिन्यात चोरट्यांनी १० लाख रुपयांहून अधिक रकमेवर हात साफ करून गेले. यातील दोन घटनामधील चोर पोलिसांनी पकडलेही पण त्यांच्याकडून हजार रूपयेही हस्तगत झालेले नाहीत.

crime
जिवलग मित्राच्या भेटीने शरद पवारही भारावले..

दोघांना केले तडीपार पण...
चोरट्यांनी गाव हादरून सोडले असतांना टोळी युद्धाचे भडकेही उडत आहे. वर्षभरापूर्वी अंबिकानगरला शिदें पितापुत्र हत्याकांड घडले. सहा महिन्यापूर्वी काही गुंडांनी कांदाचाळीवर व्यापाऱ्यावर हल्ला चढविला. आठ दिवसापूर्वी निफाड रस्त्यावर टोळीयुध्द जुंपले होते. अशा घटना पिंपळगावचा गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. जिवावर बेतणाऱ्या या प्रसंगांनी शहरवासियांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. टोळीयुध्दातील दोघांना पोलिसांनी तडीपार केले आहे, पण शहरातील गुन्हेगारीवर जरब बसविण्यासाठी पोलिस अजूनही कमी पडत आहेत हेही वास्तव आहे.

रिक्तपदांमुळे पोलिसांवर ताण
पिंपळगाव शहरासह परिसरातील २५ गावांच्या सुमारे एक लाख लोकसंख्येचा भार पिंपळगाव पोलिस ठाण्यावर आहे. मंजूर चार अधिकारी पदे भरली आहे तर पोलिस कर्मचाऱ्यांच्या ५५ पैकी ३६ पदे भरली असून १९ रिक्त आहेत. त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण आहे. होमगार्ड ही मुख्यालयावरून कधीतरी मिळतात. अपुऱ्या बळावर चोरट्यांचे व गुन्हेगारी प्रवृत्ती फावते आहे. आमदार दिलीप बनकर यांनी कर्मभूमीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करावेत अशी जनतेची मागणी आहे.

उंबरखेड रस्ता परिसरात घरफोडीचे प्रकार वाढले आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त नागरिकांना नाईलाजाने घराला कुलूप लावून बाहेर पडावे लागते. याचा फायदा चोरटे घेत आहे. पोलिसांनी हिसका दाखवून चोरट्यांच्या मुसक्या आवळायला हव्यात. अन्यथा चोरट्यांचे धाडस वाढून मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनीही गाफिल राहू नये.
-नीलेश पाटील, उपजिन्हाप्रमुख, शिवसेना.

crime
नाशिक : प्रवाशांना भुरळ घालणारा राहुड घाट बनतोय ‘मृत्यूमार्ग’!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.