नांदगावला भरदिवसा धाडसी चोरी

thief
thiefesakal
Updated on

नांदगाव (जि. नाशिक) : बौद्धनगरातील जतपुरा रस्त्यावरील बंगल्यात भरदुपारी संरक्षक भिंतीवरून उड्या मारून केलेल्या धाडसी चोरीत (Theft) दोन कुटुंबातील रोख रक्कम, दागिने व टीव्ही यांची सुमारे एक लाख रुपयांची चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. या भागात आजपर्यंत चोरी झाली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (theft in daytime in Nandgaon Nashik Crime News)

योगिता चौधरी यांचा नेकलेस, रोख रक्कम व इतर वस्तू असे मिळून सुमारे ६० ते ७० हजार रुपयांची चोरी झाली असून, जगताप यांचा २० हजार रुपये किंमतीचा टीव्ही पळवला आहे. माजी सैनिक प्रकाश जगताप यांचा बंगला असून, ते स्टेट बँक ऑफ इंडियात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांची तीन महिन्यांपूर्वी मालेगाव येथे बदली झाल्याने ते कुटुंबासह तिकडे रहायला गेले आहेत. बंगल्यात वरच्या मजल्यावर साकोरे येथील शिक्षक असलेल्या योगिता मनिराम चौधरी व त्यांचे पती मनिराम चौधरी भाडेतत्वावर राहतात. चौधरी दांपत्य कळवण तालुक्यातील असून, सुट्टीच्या काळात ते तिकडे गेले होते. शाळा उघडल्यामुळे श्री. चौधरी सोमवारी सकाळी ११ ला घराचा दरवाजा बंद करून साकोरे येथे गेले.

thief
OBC Reservation : आडनावावरून डाटा गोळा करण्यास विरोध

दरम्यान, बंगल्याचे मालक जगताप चक्कर मारण्यासाठी बंगल्यावर चारच्या सुमारास पोहोचले असता त्यांच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसला तसेच, कडीकोयंडा उचकटलेला दिसल्याने त्यांनी चौधरी व पोलिसांना कळविले. बंगल्याचे सात फुट उंचीचे मुख्य गेट बंद होते. त्यामुळे कंपाउंडच्या भिंतीवरून चोरट्यांनी आत प्रवेश केल्याचा कयास आहे. चौधरी यांच्या रूमकडे जाण्यासाठी घरातून एक व दुसरा असे दोन जिने आहेत. चोरट्यांनी घरातल्या जिन्यातून चौधरींचे घर गाठले आणि डल्ला मारला. सोन्याची एक चेन जमिनीवर पडलेली आढळून आली. त्यामुळे ती वाचली. पोलिस निरीक्षक रामेश्‍वर गाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सुरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी लगतच्या रस्त्यावर बांधकामाचे स्टील चोरून नेल्याचा प्रकार घडला होता.

thief
मालेगावी पाऊणेपाचशे किलो गांजा जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.