Nashik Crime : विंचूरला साडेसात लाखांची जबरी चोरी

Thief caught on CCTV of shop adjacent to Sonwane Hardware. In the second photo, a letter opened by thieves from a hardware store-
Thief caught on CCTV of shop adjacent to Sonwane Hardware. In the second photo, a letter opened by thieves from a hardware store-esakal
Updated on

विंचूर : येथील सोनवणे हार्डवेअर दुकानाच्या मागील पत्रा खोलून चोरट्याने सुमारे साडेसात लाख रुपयांची रोकड लंपास केली. विंचूर बाजार समितीच्या गेटलगत अविनाश सोनवणे यांचे सोनवणे हार्डवेअर दुकान आहे.

रविवारी (ता. १०) दुपारी बाराच्या सुमारास एका टेम्पोचालकाने सोनवणे यांच्या नातलगांना देण्यासाठी सात लाख ४२ हजार ९०० रुपये अमोल सोनवणे यांच्याकडे दिले होते. (theft of seven half lakhs from Vinchoor Nashik Crime)

दुकान बंद करताना सोनवणे ती रक्कम घरी नेण्याचे विसरले. रक्कम हार्डवेअरच्या गल्ल्यातच पडून होती. रात्री एकच्या सुमारास चोरट्याने हार्डवेअरच्या पाठीमागील पत्रा खोलून आतमध्ये प्रवेश केला व रोकड घेऊन पोबारा केला. जाताना सीसीटीव्हीचा डीव्हीआरसोबत नेला.

मात्र, शेजारील दुकानाच्या सीसीटीव्हीने चोराची छबी टिपली. सकाळी दुकान उघडण्यास गेलेल्या अमोल सोनवणे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी लासलगाव पोलिसांना माहिती दिली.

Thief caught on CCTV of shop adjacent to Sonwane Hardware. In the second photo, a letter opened by thieves from a hardware store-
Chh. Sambhaji Nagar Crime : वऱ्हाडी बनून आले, लाखो चोरून नेले; महिलेसह मुलगा अन् नातूलाही ठोकल्या बेड्या

त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. निफाडचे पोलिस उपअधीक्षक डॉ. निलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत सूचना दिल्या. नाशिक येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

याबाबत अमोल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक मोकळ, कर्मचारी कैलास बिडगर, बारगळ, अविनाश सांगळे तपास करीत आहेत.

Thief caught on CCTV of shop adjacent to Sonwane Hardware. In the second photo, a letter opened by thieves from a hardware store-
Nashik Crime News : कारमधून 12 किलो गांजाची तस्करी; शहर गुन्हे शाखेची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.