ढगाळ हवामान, उन्हाने शेतीकामे ठप्प! गारपिटीमुळे उष्णतेत वाढ

तालुक्यासह शहर आणि परिसरात आठवडाभरापासून उन्हामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे सर्वत्र काहिली होत आहे
cloudy weather
cloudy weather Sakal
Updated on

इगतपुरी (जि. नाशिक) : तालुक्यासह शहर आणि परिसरात आठवडाभरापासून उन्हामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे सर्वत्र काहिली होत आहे. नागरिकांच्या दैनंदिन जनजीवनावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे, तसेच थंड हवेसाठी प्रसिद्ध इगतपुरीसारख्या भागातसुद्धा तापमानाचा पारा वाढतच चालल्यामुळे ग्रामीण भागही होरपळून निघाला आहे. उष्णतेच्या या लाटेमुळे शेतीकामांना ब्रेक लागत आहे, तर रस्ते ओस पडून शुकशुकाट दिसून येत आहे. (There has been a sudden rise in temperature in Igatpuri area)

मागच्या आठवड्यात झालेला पाऊस व ठिकठिकाणी झालेली गारपिटीमुळे उष्णतेत वाढ झाल्याने अचानक उकाडा वाढला आहे. सकाळी आठपासूनच सूर्यदेवता आग ओकण्यास सुरवात करीत असल्यामुळे तीव्र उकाडा जाणवत आहे. त्यातच लॉकडाउन सुरु असून त्यामुळेही रस्त्यावरील वर्दळ आपसूकच कमी झाली आहे. कडक उन्हामुळे ग्रामीण भागात शेतात काम करणारे मजुर व शेतकरी यांचे वेळापत्रक बिघडले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या विविध कामांना ब्रेक लागत आहे, तर मजुर वेळेवर भेटत नसल्यामुळे शेतीकामे ठप्प होताना दिसून येत आहे. याबरोबरच पशुपालकांनाही पहाटेपासूनच कसरत करावी लागत आहे.

cloudy weather
नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली

बिघडले वेळापत्रक :

उन्हाचा कडाका वाढल्यामुळे शेतीकामांना आता पहाटेपासूनच सुरवात करावी लागत आहे. पिकांना पाणी देणे मशागतीची कामे करणे जनावरांचे शेणखुर, इत्यादी कामे सकाळी अकराच्या आतच करून घ्यावी लागत आहेत. उर्वरित वेळेत घरीच आराम करून पुन्हा चार वाजता शेतात काम करून घ्यावी लागत आहेत

दहशत कायम

आठ दहा दिवसापासून उष्णतेत वाढ झाली आहे. दोन महिन्यांपासून वाडीवऱ्हे, टाकेद, घोटी व इगतपुरी येथे भरणाऱ्या आठवडे बाजारही बंद झाले आहेत. इगतपुरी परिसरातही वाढलेल्या तापमानामुळे वैशाखाच्या वणव्यासारखे वातावरण झाल्यामुळे नागरिक बाहेर पडत नसल्यामुळे सध्या उशिरापर्यंत शुकशुकाट झालेला बघायला मिळत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या घटत नसल्याने दहशत कायम असल्यासारखे वाटत आहे.

(There has been a sudden rise in temperature in Igatpuri area)

cloudy weather
लॉकडाउनच्या घोषणेनंतर नाशिककरांची बाजारपेठेत तोबा गर्दी; पाहा VIDEO

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.