द्वारका (जि. नाशिक) : इगतपुरी येथील महिंद्र ॲण्ड महिंद्र (Mahindra and Mahindra) कंपनीतील भारतीय कामगार सेना युनियनमध्ये फूट पडली आहे.
कंपनीतील चारशे कायम कामगार भारतीय कामगार सेनेचा सभासद होते. (There has been split in the Indian Workers Union at Mahindra and Mahindra Company in Igatpuri nashik news)
त्यापैकी एकशे सहा कामगारांनी भारतीय कामगार सेनेला जय महाराष्ट्र करत सदस्यपदाचे राजीनामा देऊन इगतपुरी कामगार युनियन ही स्वतंत्र युनियन स्थापन करून राज्य शासना कडून नोंदणीकृत केली. महिंद्र कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ इगतपुरी कामगार युनियन नामफलकाचे अनावरण शिंदे सेनेचे नाशिक येथील माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना निमंत्रित केले होते, पण ते आले नाहीत. भारतीय कामगार सेनेत आता शिंदे गटाचा शिरकाव होतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
इगतपुरी कामगार युनियनचे अध्यक्ष विजय मोरे, उपाध्यक्ष महावीर शर्मा, सरचिटणीस संदीप विश्वकर्मा, सहचिटणीस दिलीप आहेर, खजिनदार नसीर शेख, सहखजिनदार रत्नदीप बिरजे, समिती सदस्य तुकाराम गाढवे, रमेश अहिरे, राहुल वाडेकर, मार्गदर्शक राजेंद्र कदम, अनिल जगताप, दीपक भावसार, रमेश खडांगळे, आर. जी. यादव असे आहेत.
टेस्टिंग विभागातील भारतीय कामगार सेनेचे विद्यमान डेलीगेट संजय मैंद यांनी इगतपुरी कामगार युनियन नामफलकाच्या अनावरण समारंभास उपस्थित राहून इगतपुरी कामगार युनियनच्या पदाधिकार्यांसोबत फोटोही काढून भारतीय कामगार सेनेतून फुटण्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
पुढील काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर आल्यावर ते इगतपुरी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून महिंद्र कंपनीतील कामगारांच्या समस्या व कामगारांच्या मुलांना महिंद्र कंपनीत नोकरीसाठी सामावून घेण्याबाबत बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी इगतपुरी कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
चौदा कामगार कायमस्वरूपी बडतर्फ
इगतपुरी महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनीतील भारतीय कामगार सेना युनियनने (डेलीगेट), विभाग प्रतिनिधींची आज तातडीची बैठक झाली. बैठकीत भारतीय कामगार सेना युनियनचे सभासद विजय मोरे, दिलीप आहेर, संदीप विश्वकर्मा, रत्नदीप बिर्जे, नासिर शेख, तुकाराम गाढवे, रमेश अहिरे, राहुल वाडेकर, राजेंद्र कदम, अनिल नामदेव जगताप, दीपक भावसार, रमेश खडताळे, महावीर शर्मा, राजेंद्र यादव यांनी आपल्या सभासदत्वाचा राजीनामा न देता कामगार संघटना स्थापन केल्यामुळे युनियनमधुन कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले.
"आम्ही इगतपुरी महिंद्र कंपनीतील भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी असताना भारतीय कामगार सेनेला कामगारांच्या वेतनातून लाखो रुपये फंड दिला असून सेनेचे वरिष्ठ नेत्यांना मात्र कामगारांकडे लक्ष दयाला वेळ नाही." - तुकाराम गाढवे, माजी उपाध्यक्ष, भारतीय कामगार सेना युनियन
"चौदा जणांचे सभासदत्व संपुष्टात आले आहे. असा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे. ठरावास सूचक राजेंद्र दोंदे, अनुमोदक शिवाजी मालुंजकर, ठरावावर अध्यक्ष सुनील यादव, सरचिटणीस राजेंद्र पंचारे आदीच्या सह्या आहेत. ठरावाची प्रत कंपनीतील सूचना फलकावर लावण्यात आली आहे." - राजेंद्र पंचारे, सरचिटणीस, भारतीय कामगार सेना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.