Malegaon : हनुमान चालिसा पठणासाठी तुर्तास कुणाचाही अर्ज नाही

Raj Thackeray News
Raj Thackeray Newsesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी औरंगाबाद येथील सभेत भोंगे उतरविण्यासाठी ४ मेची मुदत दिली आहे. भोंगे न उतरविल्यास मशिदींसमोरील (Masjid) मंदिरात महाआरती व हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याच पाश्‍र्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा बंदोबस्तासाठी सज्ज असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांनी सांगितले. हनुमान चालिसा पठणासाठी परवानगी मागणारा कुठलाही अर्ज मालेगाव उपविभागात आला नसल्याचे अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.

Raj Thackeray News
सातपूर परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचा मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचा प्रयत्न

शहरासह परिसरात रमजान ईद (Ramzan Eid) व अक्षयतृतीयानिमित्त (Akshay Tritiya) असलेला बंदोबस्त कायम आहे. पोलिस प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मालेगावसह उपविभागात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. मात्र, मनसे अथवा कुठल्याही संस्था, संघटनेतर्फे हनुमान चालिसा पठण, महाआरतीसाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांकडे आलेला नाही. मुळातच शहरातील बहुसंख्य मशिदी पूर्व भागात, तर मंदिरे पश्‍चिम भागात आहेत. पाच ते सहा मशिदीनजीकच मंदिरे आहेत. अशा ठिकाणी पोलिस विशेष लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबरच सोशल मीडियावरील (Social Media) संदेश व समाजकंटकांवरही सायबरसेल, साध्या वेशातील पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस लक्ष ठेवून आहेत. एकूणच भोंग्यावरून राजकारण तापले असले, तरी तूर्त हनुमान चालिसा पठण व महाआरती नसल्याने कुठलाही वाद उद्‌भवणार नाही, अशी अपेक्षा आहे.

Raj Thackeray News
नाशिकमध्ये आजान विरोधात पहाटेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांचे आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.