Nashik News : भाराभर पक्ष अन्‌ राजकीय अस्तित्व शून्य

राज्यात नाशिक हे राजकारणाचे केंद्रबिंदू. राज्यव्यापी असलेल्या माकप, भाकप, आप, रिपाइं व त्यांचे गट, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, एमआयएम, बहुजन समाज पक्ष यासारखे पक्षांचे अस्तित्व नाशिकमध्ये आहे.
aap , makapa , vanchit
aap , makapa , vanchit
Updated on

Nashik News : राज्यात नाशिक हे राजकारणाचे केंद्रबिंदू. राज्यव्यापी असलेल्या माकप, भाकप, आप, रिपाइं व त्यांचे गट, वंचित बहुजन आघाडी, प्रहार, एमआयएम, बहुजन समाज पक्ष यासारखे पक्षांचे अस्तित्व नाशिकमध्ये आहे. मात्र, नाशिकच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव असल्याचे दिसत नाही.

काही पक्ष आंदोलनाच्या माध्यमातून आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करतात. काही निवेदने देण्यावर समाधान मानतात, तर काही पक्ष सोशल मीडियावरच दिसतात. मात्र, पक्षांना स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्व मिळत नसल्याने त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम, संघटन नाही.

त्यामुळे छोटे-छोटे पक्ष अस्तित्वहीन ठरल्याचे गतवर्षातील चित्र आहे. आगामी वर्ष निवडणुकांत आपले अस्तित्व दाखविण्यासाठी या पक्षांना सक्षम नेतृत्व उभे करून ठोस भूमिका घेऊन रिंगणात उतरावे लागेल. -विकास गामने (There is no party and no political existence nashik recap 2023 news)

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) हे पक्ष केडर बेस असल्याने या पक्षात शिस्त आहे. धोरणानुसार हे पक्ष काम करत असतात. वर्षोनुवर्षे या पक्षांचे काम शहरासह जिल्ह्यात कामगार अन प्रामुख्याने आदिवासींच्या प्रश्नांसाठी काम करत आहे.

या पक्षांच्या संलग्न संघटना असून त्यांनी आदिवासींचे प्रलंबित प्रश्न, आदिवासी आश्रमशाळा वेळ बदलणे, शिक्षक चाचणी परिक्षा असो की, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्नांसाठी गत वर्षात आवाज उठवला. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. परंतु, दोन्ही पक्षाकडे नेतृत्वाच्या मर्यादा आहे, नवीन लोक जोडले जात नसल्याने त्यांचा विस्तार फारसा होऊ शकलेला नाही.

गत निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने राज्यात राजकीय पक्षांना आपले उपद्रव मूल्य दाखवून दिले. नाशिकमध्येही राजकीय पक्षांना दखल घेईल, असे प्रदर्शन पक्षाने केले. प्रामुख्याने शहरातील काही भागांमध्ये आघाडीचे अस्तित्व आहे मात्र, नेतृत्वाचा अभाव दिसतो. पक्षाची ठोस भूमिका असून, स्थानिक पातळीवरील नेत्यांना ती घेता येत नसल्याचे वर्षभरात दिसते. ठराविक आंदोलने, निवेदने देण्यापलीकडे फारसे अस्तित्व ते दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे पक्षाचे संघटन हे मर्यादेत राहिले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अनेक गट झालेले आहेत. या प्रत्येक नेत्यांचे गट नाशिकमध्ये दिसतात. यात प्रामुख्याने रिपाइं आठवले गट, कवाडे गट हे दिसतात. आठवले गट केंद्रात सहभागी आहे. त्यामुळे मोठ्या पक्षांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे या पक्षाला समर्थनही करता येत नाही वा विरोधही करता येत नाही.

aap , makapa , vanchit
Nashik News : इगतपुरी तालुका विकासाच्या प्रतिक्षेत

त्यामुळे पक्ष संघटनेचे धोरणे, कार्यक्रम, नागरिकांचे प्रश्न याबाबत पक्षाकडून फारशी भूमिका घेताना दिसले नाही. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमापलीकडे, फारसे पक्षाचे अस्तित्व वर्षभरात दिसून आले नाही.

आम आदमी पार्टी पक्ष (आप) देशभर विस्तार करण्यासाठी काम करत असून दोन राज्यात या पक्षाची सत्ता आहे. मात्र, नाशिकमध्ये या पक्षाला आपले पाय रोवता आलेले नाही. मोजके अन्‌ तेचतेच कार्यकर्ते पक्षात असून, त्यांचे पक्षांतर्गत वादच वर्षभरात सर्वाधिक गाजले. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यापलीकडे सोशल मीडियावर पक्ष अॅक्टिव्ह दिसतो. पक्षापेक्षा स्वतःचे अस्तित्वासाठी पक्षातील नेतृत्वाचे प्रयत्न होत असल्याने संघटन, विस्तार खुंटल्याचे वर्षभरात दिसून आले.

एमआयएम पक्षाने काही जिल्ह्यात चांगले प्रस्थ तयार केले. एक खासदार, दोन आमदार पक्षाचे आहे. काही महापालिकेत पक्षाचे चांगले बलाबल आहे. नाशिकमध्येही काही भागात पक्ष वाढीसाठी चांगले वातावरण आहे. मात्र, पक्षाकडे प्रभावी नेतृत्वाचा अभाव असल्याने पक्षाचे अस्तित्व वर्षभर फारसे दिसून आले नाही.

बहुजन समाजवादी पक्ष असो की, समाजवादी पक्ष या पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव असल्याने ते फारसे कार्यरत असल्याचे दिसले नाही. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्ष दिव्यांग प्रश्नावर लढा देत आहे. नाशिकमध्ये पक्षाची दिव्यांगासाठी लढाई दिसली. विविध शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगाच्या प्रश्नी स्थानिक नेतृत्वाने आवाज उठविल्याचे वर्षभरात दिसले. शेतकऱ्यांप्रति काही ठिकाणी भूमिका घेत पक्षाकडून आंदोलने केली. दिव्यांग पलिकडे

पक्षाला लोकांच्या प्रश्नी फारसा सूर गवसलेला नाही. यातच, पक्षाच्या स्थानिक नेतृत्वातच स्पर्धा सुरू झाल्याने पक्षाचा विस्ताराकडे दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्यामुळे या सर्वच छोट्या पक्षांना आपले अस्तित्व टिकविण्याचे मोठे आवाहन आहे. त्यासाठी या पक्षांना ठोस भूमिका, कार्यक्रम तसेच प्रभावी नेतृत्व घेऊन उतरावे लागेल अन्यथा हे पक्ष मर्यादित राहती

aap , makapa , vanchit
Nashik News : आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांना संरक्षण; प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.