There will be separate corona center in district nashik covid update news
There will be separate corona center in district nashik covid update news

Nashik COVID Update : कोरोनाविरोधात ‘ट्रीपल टी’चे सूत्र; जिल्ह्यात असणार स्वतंत्र कोरोना सेंटर

देशात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन विषाणूने डोके वर काढल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाही या नवीन विषाणूशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Published on

Nashik COVID Update : देशात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन विषाणूने डोके वर काढल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणाही या नवीन विषाणूशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे.

रॅपिड टेस्ट करतानाच ‘आरटीपीसीआर’ या ‘ट्रीपल टी’ सूत्रानुसार तपासणीवर भर देण्यात येत आहे. (There will be separate corona center in district nashik covid update news)

जिल्हा रुग्णालयाच्या निगराणीखाली जिल्ह्यात उपकरणांसह नवीन कोविड सेंटर सज्ज करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे शहरातही महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांसह खासगी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून सज्जतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुण्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन विषाणूचे बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे दोन आठवड्यांपासून सातत्याने जिल्ह्यातील कोरोनास्थितीसह आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेत नियोजन करीत आहेत.

‘ट्रीपल टी’चे असे आहे सूत्र

संभाव्य कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी वा प्रसार रोखण्यासाठी ‘ट्रीपल टी’वर भर दिला जात आहे. रुग्णांची कोरोनाची ‘टेस्ट’, ती पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या संपर्कातील रुग्ण ‘ट्रॅक’ करणे आणि ट्रॅक केलेल्या रुग्णांवर तत्काळ ‘ट्रीट’ करणे. टेस्ट-ट्रॅक-ट्रीट (test-track-treat) अशा रीतीने ‘ट्रीपल टी’च्या सूत्रानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी चोख नियोजन केले आहे.

There will be separate corona center in district nashik covid update news
Covid Update: नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; मात्र, JN1 व्हेरियंटबाबत घोळ कायम

जिल्हाभर स्वतंत्र सेंटर

कोरोनाचा संभाव्य प्रादुर्भाव झाल्यास त्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र कोरोना सेंटर उभारण्यात आली आहेत. या सेंटरमुळे नियमित रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली आहे.

त्यानुसार जिल्ह्यात कळवण, पेठ, वणी, उमराणे, चांदवड, सुरगाणा, नांदगाव, अभोणा, हरसूल, ननाशी, पळसण, चिंचओहोळ या ठिकाणी असलेल्या कोरोना सेंटरमध्ये सुमारे ३६८ खाटांचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे त्या-त्या परिसरातील बाधित रुग्णांवर त्याचठिकाणी उपचार करणे शक्य होणार आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय (नाशिक), सामान्य रुग्णालय (मालेगाव), उपजिल्हा रुग्णालय (कळवण), उपजिल्हा रुग्णालय (येवला), उपजिल्हा रुग्णालय (चांदवड) या रुग्णालयांत सेवा असेल.

मनपा रुग्णालयांचा आढावा

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय व नाशिक रोडचे बाळासाहेब ठाकरे रुग्णालय (बिटको) यांची पाहणी करून याठिकाणी शहरातील संभाव्य कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठीच्या पूर्वनियोजनाबाबत आढावा घेण्यात आला आहे. उपकरणांसह सोयी-सुविधा तातडीने सज्ज करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

There will be separate corona center in district nashik covid update news
Nashik COVID Update : जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’; तातडीच्या बैठकीत आढावा

‘सिव्हिल’मध्ये स्वतंत्र वॉर्ड

जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या संभाव्य प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये ऑक्सिजनसह व्हेटिंलेटरच्या सुविधांसह ३० खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यात ३१ पीएसए ऑक्सिजन प्लांट सज्ज आहेत. यांची क्षमता २०.८८ एमटी प्रतिदिन आहे. तसेच रुग्णालयांच्या गरजेनुसार जम्बो सिलिंडर, ड्युरा सिलिंडर, छोटे ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात..

आयसीयू बेड‌- ५६१

व्हेंटिलेटर बेड- ३०८

ऑक्सिजन बेड‌- १४४४

''संभाव्य कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. त्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येऊन सतर्कता बाळगण्यात आली आहे.''- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

There will be separate corona center in district nashik covid update news
Nashik COVID Update : महापालिकेकडून ‘कोविड’ साहित्याची जुळवाजुळव; कोरोना एकही रुग्ण नसल्याचे स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()