Nashik Malegaon News: शहरात चोरीच्या दोन घटनांत पावणेपाच लाख चोरट्यांनी लंपास केले. एका चोरीच्या घटनेत चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीत तीन लाख रुपये असताना अडीच लाख रुपये चोरून नेत ५० हजार रुपये मात्र डिक्कीत तसेच राहू दिले.
चोरीच्या या आगळ्यावेगळ्या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा आहे. (thief stole 2 lakh from car and keep 50 thousand nashik news)
सटाणा नाका भागातील एचडीएफसी बँक शाखेच्या पार्किंगमधील दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले अडीच लाख रुपये चोरट्यांनी लंपास करण्याचा प्रकार घडला. निखिल भास्कर कापसे (३०, रा. ओमकार कॉलनी, चर्चमागे) यांनी बँकेतून तीन लाख रुपये काढून आणले. निखिल यांनी ही रक्कम सुझुकी मोपेड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली.
रक्कम डिक्कीत ठेवून नंतर पुन्हा बँकेत व्यवस्थापकाकडे गेले. चर्चा करून परत आल्यानंतर दुचाकीने घरी पोहोचले. यानंतर डिक्की उघडली असता डिक्कीत अवघे ५० हजार रुपये मिळून आले. अडीच लाखाची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी नेमके अडीच लाख का चोरले याचीच उत्सुकता आहे. निखिल कापसे यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सव्वादोन लाखांची पिशवी पळविली
शहरातील अल्लमा पुलाजवळ गतिरोधकासमोर सव्वादोन लाखाची पिशवी पळविण्याचा दुसरा प्रकार घडला. दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी सव्वादोन लाख रुपयांची पिशवी हिसकावून पलायन केले.
सौरभ गुलाब साळुंके (२३, रा. आदर्शनगर कॉलनी) व त्यांचा मित्र कुणाल हे मोतीबाग नाका येथून अल्लमा पुलाकडे जात दुचाकीने जात असताना वर्धमान शाळेसमोरील गतिरोधकासमोर दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी सौरभच्या गाडीला कट मारून कुणालकडे असलेल्या २ लाख ३५ हजार रुपये असलेली पांढऱ्या रंगाची पिशवी हिसकावून पळ काढला. पोलिसांनी संशयित चोरट्यांचे वर्णन घेतले आहे. दोन्ही चोरीच्या प्रकरणात पोलिस सीसीटीव्ही व अन्य माहितीच्या आधारे हे चोरीचे प्रकार उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.