Nashik Crime News : त्र्यंबकेश्‍वरला भाविक महिलांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : कार्तिकी एकादशीनिमित्ताने त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविक महिलांच्या दागिन्यांची चोरी केल्याच्या घटना घडल्या. सदरील प्रकार हे त्र्यंबकेश्‍वर बसस्थानकावर घडले असून, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत सहा महिलांच्या गळ्यातील तब्बल १ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने हातोहात लंपास केले आहेत. याप्रकरणी त्र्यंबकेश्‍वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Thieves looted jewelery of devotee women at Trimbakeshwar Nashik Latest Crime News)

सिताबाई रामभाऊ मेढे (६०, रा. अंबोली, ता. त्र्यंबकेश्वर) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता. २०) दुपारी त्या त्र्यंबक बसस्थानकात असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत सिताबाई यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची ३० हजार रुपयांची सोन्याची पोत चोरून नेली. विमल शंकर कातकाडे (रा. नायगाव, ता. सिन्नर) यांच्या गळ्यातील एक तोळयाची २० हजारांची सोन्याची पोत, इंदुबाई संपत बोडके (रा. सावळी, ता. निफाड) यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ३० हजार रुपयांची पोत चोरट्याने चोरून नेली.

सुशीला लक्ष्मण रुंद्रा (रा. राज्य तेलंगणा) यांच्याकडील ४० हजार रुपयांचे दोन तोळे वजनाची पोत, शोभा उत्तम आवळे (रा. कल्याण) यांच्याकडील दीड तोळे वजनाची ३० हजार रुपयांची पोत आणि शैलजा गोविंद लोहगावकर (रा. त्र्यंबकेश्वर) यांच्याकडील अडीच तोळे वजनाची ४५ हजार रुपयांची सोन्याची पोत चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल असून, पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Crime News
Nashik Crime News : शाळकरी मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

त्र्यंबक बसस्थानक चोरट्यांचा अड्डा

कार्तिकी एकादशीनिमित्ताने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या महिला भाविकांच्या गळ्यातील दहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार बसस्थानकात घडला. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक आले होते. त्यात महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. बहुतांश भाविक स्मार्ट सिटी लिंक बसमधून त्र्यंबकेश्वरला आले होते.

याच गर्दीचा फायदा घेत बसस्थानकात सक्रिय झालेल्या चोरट्यांनी महिलांचे दागिने हातोहात लंपास केले. यात अनेकांनी पोलिसांकडे धाव घेतली तर परजिल्हा वा परराज्यातील असलेल्यांनी पोलिसांकडे न जाणेच पसंत केले. मात्र, नेहमीच भाविकांची गर्दी होणारे त्र्यंबक बसस्थानकावरील चोरट्यांचा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त करावा आणि गस्त वाढवावी अशी मागणी भाविकांनी केली आहे

Crime News
Nashik Crime News : कारागृहात कैद्याचा कर्मचाऱ्यावर हल्ला; नाशिकरोड येथील घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.