नामपूर : येथील साक्री रस्त्यालगत असणाऱ्या वृषाल नेर यांच्या शेतातून दुसऱ्यांदा विहिरीत बसवलेली साडेसात अश्वशक्ती क्षमतेची इलेक्ट्रिक मोटार चोरीस गेली.
जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान चोरट्यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळविल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. (Thieves march now towards agriculture Electricity pump stolen for second time in Nampur No police investigation Nashik Crime)
शहर व परिसरात वारंवार होणाऱ्या चोरींमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने पोलिसांच्या कामकाजाविषयी नागरिकांमध्ये नाराजी होती, पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तक्रारदार नेर यांची साक्री रस्त्यालगत गट क्रमांक १४८६/१ मध्ये १ हेक्टर ६८ गुंठे क्षेत्र आहे. सकाळी शेतात आल्यानंतर चोरीची घटना त्यांच्या काकांची शेती कसणाऱ्या खुशाल भदाणे यांच्या लक्षात आली. जुलै महिन्यात वृषाल नेर यांची टेक्समो कंपनीची मोटर चोरीस गेली होती, त्यानंतर चार महिन्यात पुन्हा चोरीची घटना घडल्याने त्यांचे सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
यापूर्वी साक्री रस्त्यालगतच शिवसेनेचे संभाजी सावंत, प्रगतशील शेतकरी महेंद्र सावंत यांच्या शेतातून साडेसात अश्वशक्ती क्षमतेच्या मोटारी चोरीला गेल्या आहेत. यापूर्वी शेतातून शेतीपयोगी साहित्य चोरीला जात असल्याने शेतकरी वैतागले आहेत.
काही वर्षांपूर्वी बिजोरसे (ता. बागलाण) येथील व्यावसायिक धनंजय मोरे यांच्या दुकान आणि घरातून रोख रक्कम, घरातील सोन्याचे दागिने असा सुमारे १ लाख ५० हजार रुपयांची चोरी करीत चोरट्यांनी पोबारा केला होता. चोरीनंतर चोरांनी डिव्हीआरही पळवून नेला होता.
शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असून चोरयांचा तपास लागत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. प्राथमिक शिक्षक (कै) प्रशांत कापडणीस यांच्या घरातून चोरांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे दोन लाखांचा ऐवज लुटला.
प्रतिष्ठित व्यापारी असगरअली बोहरी यांच्या घरातून ३५ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. नळकस रस्त्यालगत माजी सैनिक (कै). कारभारी देवरे यांच्या घरी पडलेल्या दरोड्यात लाखोंचा ऐवज लुटून देवरे दांपत्यास बेदम मारहाणही झाली होती.
पोलिसांनी वेगाने सूत्र फिरवून चोरांच्या मुसक्या आवळाव्या अशी सर्वसामान्य अपेक्षा नामपूरवासीय बाळगून आहेत.
"नामपूर शहर व परिसरात खाकीचा धाक कमी झाल्याने भुरट्या चोऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात घरफोडी, जनावरे चोरीस जाणे, वाहनचोरी, दुकान फोडणे, वाहनांमधील पेट्रोलचोरी, शेतीअवजारांच्या चोऱ्या आदी बाबींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. जिल्हा पोलिसप्रमुख यांनी याकामी लक्ष घालून पोलिस बल वाढवावे."
- गणेश खरोटे, मोसम प्रतिष्ठान, नामपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.