Nashik Crime News : आजीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; पोलिसांसमोर आव्हान

nashik crime news
nashik crime newsesakal
Updated on

चांदवड (जि. नाशिक) : तालुक्यातील निमोणच्या आजी निफाड तालुक्यातील धारणगाव येथील लेकीला भेटायला निघाल्या अन् मध्येच मनमाडला दोन महिलांसह एका रिक्षाचालकाने आजीच्या अडीच तोळे सोन्याच्या पोथीवर डल्ला मारला. तब्बल सव्वालाख रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरीला गेल्याने ६५ वर्षीय आजी धाय मोकलून रडत होत्या. (Thieves raid old women jewelry A challenge to police Nashik Latest Crime News)

nashik crime news
Nashik : सायखेडा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा बोटिंग करतांना बुडून दुर्दैवी मृत्यू

निमोण येथील छबाबाई विठ्ठल उगले (वय ६५) या धारणगाव (ता. निफाड) येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी निघाल्या होत्या. नातवाने दुचाकीवर मनमाडपर्यंत आजीला सोडले. त्यानंतर आजी मनमाड- चांदवड रोडवरील महात्मा गांधी विद्यामंदिरच्या महाविद्यालयासमोरील बस थांब्याजवळ लासलगाव बसची वाट पाहत होत्या. त्याचवेळी एक रिक्षाचालक आजीजवळ आला व कुठे जायचे आहे, अशी विचारपूस केली.

त्यावर आजींनी लासलगावला जायचे असून, माझे बसला अर्धे टिकीट आहे, मी बसने जाणार आहे, असे सांगितले. त्याचवेळी अगोदरच रिक्षात बसलेल्या दोन महिलांनी आजीला तुम्ही भाडे नका देऊ, आम्ही चाललोच आहे तर तुम्हाला लासलगावला सोडतो असे सांगितले. आजीला गोड बोलून रिक्षाचालक व या दोन महिलांनी रिक्षात बसवले. रिक्षा लासलगाव फाट्यापर्यंत गेल्यानंतर रिक्षाचालक व दोन्ही महिलांनी आजीला पुढे चोर आहेत, असे सांगून दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आजीने आपल्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची पोत पिशवीत काढून ठेवली.

त्यानंतर रिक्षाचालकाने ‘मी या महिलांना सोडून येतो’ असे असे सांगून आजीला लासलगाव रोडवरील वागदर्डी फाट्यावर उतरुन दिले. काही वेळानंतर आजीला आपण लुटले गेल्याचे समजले. आपली आयुष्यभराची कमाई उतारवयात चोरीला गेल्याने आजी प्रचंड निराश झाल्या. त्यानंतर आजी व आजीच्या मुलाने मनमाड पोलिसांना घटनेची माहिती दिली. आता या त्रिकुटाला शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

nashik crime news
Nashik Crime: आरक्षित रेल्वे तिकीटांचा मोठा घोटाळा; १६ हजारांच्या तिकिटांसह तरुणाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.