Nashik Crime News: बसस्थानकांवर चोरट्यांचा सुळसुळाट; महामार्गावर दीड लाख तर, ठक्कर बाजारला आयफोन चोरीला

crime news
crime newsesakal
Updated on

नाशिक : शहरातील तीनही बसस्थानकांवर सातत्याने चोरट्यांकडून प्रवाशांचे ऐवज लांबविण्याच्या घटना घडत आहेत. महामार्ग बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर मुंबई नाका पोलिस ठाणे असून, या ठिकाणीही प्रवासी महिलेच्या बॅगेतील सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

यामुळे शहरातील ही बसस्थानके आहेत की चोरट्यांचा अड्डा, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. (Thieves rampant at bus stops one half Lakh on station iPhone stolen from Thakkar Bazar Nashik Crime News)

महामार्ग बसस्थानक येथे आलेल्या महिलेच्या बॅगेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाखांचे दागिने लंपास केले. कल्पना दीपक खैरनार (रा. निसर्ग नगर, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, त्या रविवारी (ता. २) दुपारी पावणे दोनच्या सुमारास महामार्ग बसस्थानक येथे गेल्या.

बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हॅण्डबॅगमधून सोन्याचे दागिने व रोकड असा १ लाख ३९ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक उपनिरीक्षक आडके तपास करीत आहेत.

तर, ठक्कर बाजार बसस्थानक येथे बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने युवतीचा आयफोन लंपास केला. संगीता प्रशांत बैरागी (रा. विनयनगर, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता.२) दुपारी दीडच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्थानक येथे मुलीला सोडविण्यासाठी आल्या होत्या.

त्यावेळी गर्दीमध्ये त्यांची मुलगी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिचा ३० हजार रुपयांचा आयफोन मोबाईल लंपास केला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

crime news
Crime News : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक ; वकिलाला अटक

घटना नेहमीच्याच

काही दिवसांपूर्वीच महामार्ग बसस्थानकावर चोरट्याने गर्दीमध्ये एका प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन खेचण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी एका जागरूक वृद्ध प्रवाशाने ही बाब हेरली आणि चोरट्याचा हात पकडला. प्रवाशांनी त्यास फटकावल्यानंतर मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात दिले होते.

अशा स्वरूपाच्या घटना शहरातील मेळा बसस्थानक (सीबीएस), ठक्कर बाजार बसस्थानक, महामार्ग बसस्थानक या ठिकाणी सातत्याने घडतात. मात्र, चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अद्यापपर्यंत यश आलेले नाही.

एवढेच नव्हे तर रिक्षा प्रवासातूनही प्रवाशांचा ऐवज हातोहात लंपास केला जातो. बसस्थानकांमध्ये सातत्याने सावधगिरीच्या सूचना दिल्या जात असल्या तरी गर्दीमध्ये चोरटे सावज हेरून ऐवज लांबवितात. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होते आहे.

crime news
Pune Crime : ओपम जीम दुर्घटने प्रकणी अद्यापही दोष निश्चिती नाही...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()