Nashik Crime : दिवसेंदिवस तालुक्यात चोरीचे प्रमाण हे वाढलेलेच आहे. दिवसाढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील मुसळगाव येथे रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (thieves robbed house while villagers in saptaha kirtan Nashik Crime)
मुसळगाव येथे गुरुवार (ता. २५) पासून अमृतमहोत्सवी सप्ताह सुरू झालेला असून या निमित्त गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. सप्ताहाचा पहिला दिवस असल्याने सकाळी महंत दौलत दास महाराज, नारायण महाराज पंढरपूरकर, स्वामी राधेश्वरानंदगिरी यांचे दर्शन व प्रवचनाचा कार्यक्रम होता.
या निमित्त गावातील संपूर्ण ग्रामस्थ सप्ताहासाठी जमले होते. दरम्यान घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर चोरट्यांनी हातसफाई केली. मुसळगाव येथील रामनाथ वामन शिरसाठ व त्यांच्या घरातील इतर सदस्य सप्ताहनिमित्त सकाळी घराला कुलूप लावून गावात गेलेले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यावेळी चोरट्यांनी घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केले. लॉकर मधील अंदाजे पाच ते सहा तोळे सोन्याचे दागिने तसेच तीस हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
शिरसाठ हे दुपारी एकच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामराव निकम, श्री. गरुड, पोलिस उपनिरीक्षक वाजे, सचिन काकड, विनोद इप्पर, स्वप्नील पवार आदींनी घटनास्थळी भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.