Nashik News: मांजरपाडाचे पाणी भागवते येवल्याची तहान! मोहन शेलार

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on

Nashik News : मांजरपाडाची निर्मिती येवलासाठी आहे आणि मांजरपाडाच्या पाण्याने भरले जाणारे ओझरखेड धरणाचे पाणी येवला मतदासंघासाठीच आहे.

पुणेगाव धरणात उपलब्ध होणाऱ्या ६०६ पैकी ३५८ दशलक्ष घनफूट पाणी प्राधान्याने दरसवाडीसाठी आरक्षित आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने दरसवाडी कालव्याला पाणी सोडले आहे, अशी माहिती पाणी आंदोलक मोहन शेलार यांनी दिली. (Thirst to be satisfied with water of Manjarpada Mohan Shelar Nashik News)

तालुक्याचे दुष्काळीपण घालविण्यासाठी श्री. भुजबळ यांनी नाशिकला मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात गुजरातला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रात वळविणारा मांजरपाडा प्रकल्प मंजूर करून घेतला आणि अनेक अडचणींना तोंड देत २००९ ते २०१९ या केवळ १० वर्षांत प्रकल्प पूर्ण केला.

जुलै २०१९ ला मांजरपाडा प्रकल्पाचे श्री. भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन झाले. २०१९ ते २०२२ पर्यंत पुणेगाव, ओझरखेड, पालखेड, दरसवाडी धरणे भरली. २०१९ ला पहिल्यांदा पुणेगाव धरणातून दरसवाडी धरण भरले.

५० वर्षांनंतर पुणेगाव-दरसवाडी कालव्याला तालुक्यातील तीन पिढ्यांची स्वप्न पूर्ण करत पुणेगावपासून बाळापूरपर्यंत पाणी आले होते. केवळ याच कालव्याला पाणी आले नाही, तर याच पाण्याने सतत ओझरखेड, पालखेड भरून निफाडसह येवला तालुका पाण्याने तृप्त राहिला.

मात्र, या वर्षी मांजरपाडा लाभ क्षेत्रात पाऊस कमी आहे. पावसाचे दोन महिने संपले असताना, पुणेगाव भरले आणि पुणेगावमधून दरसवाडीसाठी पाणीही सोडले आहे.

पुणेगाव कालवा जुना असल्याने अनेक ठिकाणी लिकेजेस, कुठे उंच तर कुठे खोल, कुठे रुंद तर कुठे अरुंद, अशा कालव्यावर यांत्रिकी विभाग पाणी पोचविण्यासाठी प्रयत्न करीत राहिला. मात्र, लिकेजेसमुळे बाळापूरच्या पुढे पाणी सरकले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chhagan Bhujbal
Nashik Water Crisis: म्हसरूळ भागात कमी दाबाने, अवेळी पाणीपुरवठा; जलकुंभाचे काम पूर्ण होऊनही टंचाई

२०२२ मध्ये अधिवेशनात भुजबळ यांनी चतुर्थ सुप्रमाचा मुद्दा लाऊन धरल्याने तत्कालीन देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी चतुर्थ सुप्रमाला मंजुरी दिली.

डिसेंबर २०२२ मध्ये पुणेगाव ते दरसवाडी कालवा समपातळी दुरुस्ती, अस्तरीकरणासाठी १५८ कोटी, तर दरसवाडी ते डोंगरगावसाठी कालवा समपातळी दुरुस्ती व अस्तरीकरणासाठी ९८ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली.

कामाचा कार्यारंभ काही दिवसांत भुजबळ करून घेतील आणि त्याचे कामही पावसाळा संपताच सुरू होईल, असे श्री. शेलार यांनी सांगितले.

पावसाळ्याचे दोन महिने संपले, तरी मांजरपाडा लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस आहे. मांजरपाडा बोगदा आजमितीस केवळ १०० क्यूसेसने प्रवाहित आहे. पुणेगाव ९० टक्के भरले आहे.

ओझरखेड फक्त ३० टक्के असून, निफाड-येवला तालुका सिंचनासह ६० गावांना पाणीपुरवठा करणारी ३८ गाव पाणीयोजना, येवला शहर पूर्णतः पालखेड आणि ओझरखेडवर अवलंबून आहे. हे पाणी येवल्याला मिळणारच आहे.

मांजरपाडा लाभक्षेत्रात असाच पाऊस राहिला, तर परिस्थिती चिंताजनक आहे. येत्या काही दिवसांत अस्तरीकरणाचे काम सुरू होऊन वर्षभरात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर डोंगरगावपर्यंत निश्र्चित पाणी जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
Nashik News: ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके’च्या घोषात नवचंडी याग! सप्तशृंग गडावर आकर्षक आरास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.