Nashik News : ‘पीएम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार असल्याने यंदाची दिवाळी गोड होणार आहे. राज्यातील १३ लाख ४५ हजार शेतकरी ‘पीएम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेसाठी पात्र ठरले. कृषी विभागाने ‘नमो किसान योजने’साठी एक हजार ७२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.
नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आला. शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे. (Thirteen and half lakh farmers are eligible for PM Kisan Namo Shetkari nashik news)
केंद्र आणि राज्याचे प्रत्येकी सहा हजार या प्रमाणे दरवर्षी बारा हजारांचा सन्माननिधी बळीराजाला मिळणार आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेसाठी आगामी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी सहा हजार ९०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.
राज्यात ‘नमो किसान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्यासाठी ऑगस्टपासून राज्य शासनामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत होती.
याकामी कृषी विभागाने पुढाकार घेऊन महसूल, भूमिअभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमिअभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता केल्याने राज्यातील सुमारे साडेतेरा लाख शेतकऱ्यांना या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र ठरविण्यासाठी यश मिळाले आहे.
‘पीएम किसान’ योजना नव्याने सुरू करण्यात आली, त्यावेळी राज्यातील सुमारे एक कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ९५ लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र, अटींची पूर्तता न केल्याने १३व्या आणि १४व्या हप्त्यात त्यापैकी ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना ‘पीएम किसान’चा प्रत्यक्ष लाभ मिळाला. उर्वरित शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेता आला नाही.
ई-केवायसीची अट अनिवार्य
९५ लाखांपैकी मृत, कर भरणारे व इतर कारणांनी रद्द करून ९२.८७ लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. त्यापैकी ८२.५९ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले होते. कृषी विभागाने मोहीम हाती घेतल्यावर ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषीमित्र यांसह कर्मचाऱ्यांनी शिबिरे घेत आणि बांधावर जात १३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते संलग्न करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेतली. यात ९.५८ लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, २.५८ लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, १.२९ लाख शेतकऱ्यांच्या भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करण्याबाबत कामकाज पूर्ण झाले. ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आल्याने योजनेच्या कामाला गती मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.