Ganeshotsav 2023 : जिल्ह्यात यंदा 906 ‘एक गाव एक गणपती’
Ganeshotsav 2023 : जिल्ह्याभरात गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहेत. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे.
असे चित्र असले तरी लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी जिल्हाभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यात लहान, मोठे, सार्वजनिक तसेच ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेसह सुमारे ३ हजार मंडळांना परवानगी देण्यात आलेली आहे. (This year 906 one village one Ganpati in district nashik news)
गणेशोत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलिसांकडून हद्दीनिहाय पेट्रोलिंग करून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील ९०६ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेनुसार गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
लाडक्या गणरायाचे उद्या (ता.१९) उत्साहाच्या वातावरणात स्वागत होणार आहे. मात्र यंदांच्या गणेशात्सवावर दुष्काळाचे सावट आहे. अपुऱ्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. अजूनही काही तालुक्यांमध्ये पेरण्या झालेल्या नाहीत. त्यातच टोमॅटो, कांदा आणि भाजीपाल्यालाही चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्याचा थेट परिणाम गणेशोत्सवावर होण्याची चिन्हे आहेत. त्यातच, वाढती महागाई आणि शेतमालाचे घसरलेले दर आणि दुसरीकडे वाया गेलेला खरीप हंगाम यामुळे जिल्ह्यातील शेतकरी गणरायाच्या आगमनाबरोबरच पावसाच्याही आगमनाची वाट पाहतो आहे. त्यामुळे येता रब्बी हंगामात तरी शेतकऱ्याला दिलासा मिळू शकेल.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस सज्जता बाळगली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे. जिल्हाभरातील ४० पोलिस ठाण्याच्या हद्दीत कडेकोट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून परवानगीसाठी पोलिस ठाण्यामार्फत अर्ज केलेले आहेत.
त्यानुसार, जिल्ह्यातील सुमारे ३ हजार सार्वजनिक लहान-मोठ्या गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. सामाजिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत. याशिवाय संवेदनशिल असलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.