वरुणराजाच्या हजेरीनंतरही 3 तालुक्यात कमी पाऊस

Rain
Rainesakal
Updated on

नाशिक : वरुणराजाच्या हजेरीनंतरही इगतपुरी, येवला आणि त्र्यंबकेश्‍वर तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच तिसगाव, भावली, नाग्यासाक्या, माणिकपूंज या धरणांमध्ये उपयुक्त जलसाठा शून्य झाला आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा ४ टक्क्यांनी कमी म्हणजे, सद्य:स्थितीत २३ टक्के जलसाठा उरला आहे. नाशिककरांचे पाणी अवलंबून असलेल्या गंगापूर धरणात गेल्यावर्षीपेक्षा १० टक्क्यांनी म्हणजेच आता २८ टक्के जलसाठा उरला आहे.

Rain
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची काळजी कशी घ्याल? या सोप्या टिप्स फॉलो करा

जिल्ह्यात जूनमध्ये १३९.५ मिलिमीटर सर्वसाधारण पाऊस अपेक्षित असतो. आतापर्यंत ११२.५ मिलिमीटर म्हणजे, ८०.६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी ७५.४ टक्के पावसाची नोंद झाली होती. इगतपुरी तालुक्यात २१, येवल्यात ४२.१, त्र्यंबकेश्‍वरमध्ये २८.७ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. इतर तालुक्यातील पावसाची टक्केवारी अशी : मालेगाव-१८५.२, बागलाण-१२०.२, कळवण-११३.५, नांदगाव-१३०.९, सुरगाणा-६३.१, नाशिक-७०, दिंडोरी-१०५.२, पेठ-६५.४, निफाड-११९.५, सिन्नर-११९.२, चांदवड-१५४.१, देवळा-१४७.८.

१० धरणांमध्ये कमी पाणी उपलब्ध

गंगापूर, कश्‍यपी, आळंदी, पालखेड, दारणा, वालदेवी, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, केळझर या धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत आता उपयुक्त जलसाठा कमी उपलब्ध आहे. धरणातील उपलब्ध जलसाठ्याची टक्केवारी अशी : कश्‍यपी-१६, गौतमी गोदावरी-२६, आळंदी-२, पालखेड-४२, करंजवण-११, वाघाड-५, ओझरखेड-२६, पुणेगाव-११, दारणा-१४, मुकणे-३१, वालदेवी-१०, कडवा-१४, भोजापूर-६, चणकापूर-२०, हरणबारी-२४, केळझर-५, गिरणा-३३, पूनंद-१९.

Rain
दिल्लीत उष्मा वाढणार, आसाममध्ये पूर; 'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.