Nashik Wild Vegetable : निसर्गाच्या लहरीपणामुळे रानभाज्यांवर संक्रांत; हक्काच्या रोजगारावर फिरले पाणी

Women selling small quantity of wild vegetables in weekly market.
Women selling small quantity of wild vegetables in weekly market.esakal
Updated on

Nashik Wild Vegetable : निसर्गाचा लहरीपणा, वातावरणातील रोजच्या घडामोडी आणि पावसाच्या रडकुंडीच्या खेळामुळे यंदाच्या पावसाळी हंगामाची सांगता होण्याची वेळी आली तरीही पावसाच्या माहेरघरात पावसाची अनुभूती आली नाही.

दरम्यान, पावसाचे गायब होण्याने विविध रानभाज्या व पावसाळी मेवासुद्धा दुर्मिळ होऊन दुरापास्त झाला आहे. (This year not single Gavran vegetable has come to market for sale nashik news)

नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागातील डोंगरकपारी व घनदाट जंगलात राहणाऱ्या हरसूल, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, वणी, नांदुरी, कळवण व सापुतारा या भागातील आदिवासी बांधव विविध प्रकारच्या रानभाज्या व इतर पावसाळी मेवा विक्रीसाठी आणत होते. मात्र यंदा हे चित्र जिल्हाभरात कुठेही दिसून आले नाही.

आदिवासी दुर्गम भागातील रानभाज्यांमध्ये कर्टोंली, शेवळा, जाईचा मोहोर, कोळीची भाजी, करडई, खुरासनीची भाजी, टाकळा, अंबाडी, लालमाठ, गावरान भेंडी, चाकवत, तांदुळ्या, तांदुळका, मोहरी व इतर भाज्यांचा समावेश आहे. मात्र यंदा कर्टोंली सोडून एकही गावरान भाजी बाजारात आली नाही. त्यामुळे यंदाचा पावसाळा या भागासाठी धोक्याची घंटा ठरला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Women selling small quantity of wild vegetables in weekly market.
Nashik Onion News : कांदा साठवण क्षमता 50 हजार टनांनी वाढणार; कांदा चाळ उभारण्याच्या 27 प्रस्तावांना मंजुरी

आता तरी रानभाज्या मिळतील का?

सध्या बाजारात फक्त कर्टोंली उपलब्ध असली तरी ती आदिवासी भागातील नव्हे, तर बागेत पिकवलेलीच आहेत. दरम्यान आदिवासी भागात येणाऱ्या या रानभाज्या औषधी असल्यामुळे पावसाळा संपत आला तरी त्यांची मागणी होत आहे व या भाज्या पुढील काळात येणाऱ्या उपवासाच्या काळात तरी मिळतील का? अशी विचारणा भाजी विक्रेत्यांना होत आहे.

"पावसाळ्यात येणारी प्रत्येक रानभाजी ही शरीरासाठी पोषक व उत्तम असते. या भाज्या उष्ण नसतात शिवाय या भाज्यांमुळे वात, पित्तासारखे विकार होत नाहीत. या भाज्या खाणे आरोग्यासाठी चांगलेच असते." -डॉ. अभिजित गाडे, आयुर्वेदतज्ज्ञ

"यंदाच्या हंगामात पावसाळा पाहिजे तसा जाणवला नाही. पावसाने दडी मारल्यामुळे रानभाज्यांचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे आमच्या हक्काच्या रोजगारावर गदा आली आहे." -सावित्रा खडके, भाजी विक्रेती, चिंचलेखैरे

Women selling small quantity of wild vegetables in weekly market.
Nashik News : दोन संचांच्या मनुष्यबळात वीज केंद्रात तीन संच सुरू; कामगारांत असंतोषाचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()