Tribal Day 2023: यंदाचा आदिवासी दिन पालघर जिल्ह्यात होणार

Department of Tribal Development
Department of Tribal Developmentesakal
Updated on

Tribal Day 2023 : यंदाचा जागतिक आदिवासी दिन ( ९ ऑगस्ट) ‘आदिवासी तरुण हेच स्वनिर्णय बदलाचे प्रतिनिधी’ या संकल्पनेवर आधारित असून, यात हवामान बदल, स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येणे, पिढ्यानपिढ्यांमधील सुसंवाद हे तीन विषय अधोरेखित केले आहेत. (This year tribal day 2023 will be held in Palghar district nashik)

आदिवासी विकास विभागाकडून यंदाचा जागतिक आदिवासी दिन पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामधील राजीव गांधी मैदान येथे बुधवारी (ता. ९) साजरा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.

आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली यंदाचा आदिवासी दिन साजरा होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Department of Tribal Development
Independence Day 2023 : स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठेला तिरग्यांचा साज; टी- शर्ट, कुर्ता घेण्यासाठी गर्दी

सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

कृषी, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, चित्रपट व अभिनय, समाजसेवा या क्षेत्रात यश मिळविलेल्या, तसेच या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या आदिवासी बांधवांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.

आदिवासीबांधव व सर्व नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागातर्फे करण्यात आले आहे.

Department of Tribal Development
Independence Day 2023: जिल्हाधिकारी कार्यालय आवारात स्वातंत्र्यदिनासाठी फुलणार उद्यान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.