Water Scarcity : ‘अल निनो’ हा समुद्रीप्रवाह सक्रिय झाला आहे. त्याचा देशातील मॉन्सूनच्या पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जूननंतरही पाणीटंचाईच्या झळा जाणवणार असल्याने पाणीटंचाईच्या उपाययोजनांचे निर्देश राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेत ग्रामीण भागातील टंचाई आराखडे तयार करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, याकडे तालुक्यांनी पाठ फिरविली.
आतापर्यंत १५ तालुक्यांपैकी केवळ पाच तालुक्यांतून संभाव्य टंचाई आराखडे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. (threat of El Nino even after June possibility of water scarcity Additional Scarcity Plan nashik news)
काही दिवसांपासून दक्षिण पॅसिफिक महासागरात ‘अल निनो’ हा समुद्रीप्रवाह सक्रिय झाला असून, त्याचा देशातील मॉन्सून पर्जन्यमानावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
‘अल निनो’मुळे होणारा परिणाम लक्षात घेता राज्यात जूनमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची भीती आहे. संभाव्य पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याच्या पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत यंत्रणेला सूचना केल्या होत्या. या बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यात अल निनो परिस्थितीमुळे यंदाचा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, यावर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन केल्यास संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीपासून बचाव करता येईल.
यासाठी ग्रामीण भागातील टंचाई आराखडे लवकर तयार करावे, असे निर्देश दिले होते. पाच वर्षांत ज्या ज्या ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली, अशा गावांचा समावेशदेखील टंचाई आराखड्यात करण्यात यावा, ग्रामपंचायतीचे पाण्याचे स्रोत, खासगी पाण्याचे स्त्रोत या माहितीचे संकलन करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
त्यानंतर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविले होते. यासाठी ५ एप्रिल ही डेटलाइन देण्यात आली होती. परंतु, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, चांदवड, देवळा व निफाड या पाच तालुक्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. इतर दहा तालुक्यांतून अद्यापही प्रस्ताव प्राप्त झालेले नाहीत.
‘अल निनो’चा परिणाम काय
‘अल निनो’मुळे पर्जन्यमानावर परिणाम होण्यासह चालू उन्हाळ्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊन जलसाठा मोठ्या प्रमाणात खालावण्याची शक्यता आहे. परिणामी आगामी काळात पाणीटंचाईची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
काटकसरीने करावा लागणार पाण्याचा वापर
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरात ‘अल निनो’ हा समुद्रीप्रवाह सक्रिय झाल्यामुळे वातावरणात विषम बदल होणार आहेत. त्यात एप्रिल ते जूनदरम्यान उष्णतेतही वाढ होणार असल्याने प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होणार आहे. त्यामुळे जनतेला पुढील काळात पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.