नाशिक : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून वन्यजीवांच्या अवयवांची विक्री; तिघांना अटक

शहरातील उच्चभ्रू भागातील कारवाईत तिघांना अटक
 three arrest crime news Sale of wildlife parts by college students nashik
three arrest crime news Sale of wildlife parts by college students nashikSakal
Updated on

नाशिक : अंबोली, कनाशी येथून वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या घटना ताज्या असताना बिबट्याची कातडी विकणाऱ्या तिघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वनविभागाच्या विशेष पथकाने मंगळवारी (ता.२०) शहरातील कृषीनगर जॉगिंग ट्रक परिसरातील सायकल सर्कल येथून अटक केली. या तिघा संशयित यांच्याकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एका बिबट्याच्या कातडीसह चिंकारा, नीलगाय यांची प्रत्येकी दोन शिंगे देखील जप्त केली आहे. जिल्ह्यासह थेट शहराच्या मध्यवस्तीत हा सर्व प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अंबोली घाट आणि नाशिक- पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर बिबट्याच्या कातडीचा तस्करी करणाऱ्या अटक केल्यानंतर नाशिक वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरातील काही तस्कर यांच्याकडे बिबट्याची कातडी विक्रीस असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी मुख्य वनसंरक्षक, पश्‍चिम विभागाचे उपवनसंरक्षक आणि सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या मदतीने बनावट ग्राहक बनत तस्कर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शहरातील कृषीनगर जॉंगिग ट्रक परिसरात भेटण्यासाठी वेळ घातला. त्यानुसार वनविभाच्या पथकाने मंगळवारी (ता.२०) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या भागात सापळा रचला. त्यानंतर याठिकाणी संशयित तिघे जण हे वन्यजीवांचे अवयव विक्रीसाठी घेऊन आले. त्यानंतर त्यांनी अवयव दाखविताच या सर्व तस्कर यांना पथकाने अवयवांची विक्री करतांना रंगेहाथ पकडले.

या तस्करांकडून वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. भदाणे यांनी अधिक माहिती घेतली असता ते सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी निघाले. त्यामुळे या तस्करीमध्ये आणखी संशयित असल्याची शक्यता विभागाकडून दर्शविण्यात आली आहे. या कारवाईत पथकाने ह्या संशयित यांच्याकडून बिबट्याची कातडीसह चिंकार आणि नीलगायी यांची प्रत्येकी दोन शिंगे आणि चार मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. या तिघां संशयित यांच्याविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.