मरावे परी कीर्तिरूपे उरावे! मरणानंतरही अमर व्हायचंय तिघा तरुणांना; संकल्प वाचून व्हाल थक्क

body doante 4.jpg
body doante 4.jpg
Updated on

नाशिक / वडेल : देह कुबेराचे धन हे काळाचे। तेथे मनुष्याचे काय आहे?’ या निर्लोभ भावनेतून जिवाभावाचे मित्र असलेल्या अतुल, नीलेश व महेश या उच्चशिक्षित तरुणांनी आजच्या तरुणाईपुढे वेगळाच आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कर्तृत्वाने सर्वत्र कौतुक होतय. एकदा वाचाच...

त्यांचा संकल्प कौतुकास्पद!

संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार ‘देह कुबेराचे धन हे काळाचे। तेथे मनुष्याचे काय आहे?’ या निर्लोभ भावनेतून जिवाभावाचे मित्र असलेल्या अतुल, नीलेश व महेश या उच्चशिक्षित तरुणांनी नाशिकच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागाकडे आपल्या देहाचे मरणोत्तर दानपत्र सादर केले आहे.अजंग (ता. मालेगाव) येथील तीन उच्चशिक्षित तरुणांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प सोडत तरुणाईपुढे वेगळाच आदर्श ठेवला आहे. सामान्य कुटुंबातील या तिन्ही मित्रांपैकी अतुल वाघ हे पदव्युत्तर पदवीधारक असून, मालेगाव येथे वरिष्ठ महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाचे अधिव्याख्याता आहेत. याच विषयात ते पदव्युत्तर संशोधनही करीत आहेत. या तिघा तरुणांनी नश्‍वर असलेल्या शरीराचे अवयव मरणोत्तर एखाद्या गरजू व्यक्तीच्या कामी यावेत, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील शरीरशास्त्राच्या अभ्यासासाठी आपल्या देहाचा उपयोग व्हावा, या उदात्त हेतूने मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रवर्य  त्रिकूटाचे आवाहन 
महेश शेलार अभियांत्रिकी विषयातील पदवीधारक असून, नारायणगाव (जि. पुणे) येथे बांधकाम व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. नीलेश महाले स्थापत्यशास्त्रातील अभियांत्रिकी पदवीधारक असून, मालेगाव येथील खासगी बांधकाम प्रतिष्ठानाकडे वरिष्ठ निरीक्षक व अभियंता म्हणून काम करतात. देहदान व अवयवदानाबद्दल जनजागृती निर्माण होऊन समाजातील अनेक घटकांनी देहदान व अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहन मित्रवर्य असलेल्या या त्रिकूटाने केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे परिसरात कौतुक होत आहे. 

देहदान करणे ही काळाची गरज असून, समाजामध्ये याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. देहदानाच्या निर्णयामुळे गरजूंना अवयव मिळण्यास मदत होते. मीसुद्धा मरणोत्तर देहदानाचा संकल्प सोडला आहे व आवेदनपत्र भरून दिले आहे. -दिलीप हिरे, माजी सैनिक, मालेगाव 
 

अजंगच्या तिघा तरुणांच्या मरणोत्तर देहदानाचा संकल्प खरोखर वाखाणण्याजोगा आहे. वैद्यकीय शास्त्रात अभ्यास व संशोधनासाठी तसेच अवयवांच्या परिपूर्तीसाठी देहदान उपयुक्त असून, समाजात याविषयी जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. 
-डॉ. केशव खैरनार, वैद्यकीय व्यावसायिक, अजंग  

 संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.