Nashik Bribe Crime News : सुरगाण्यात ACBच्या कारवाईत तिघेजण जाळ्यात

Bribe crime
Bribe crimeesakal
Updated on

सुरगाणा (जि. नाशिक) : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरगाणा या आदिवासी भागात कारवाई केली आहे. या कारवाईत पंचायत समितीचे बचत गट कर्ज वितरण विभागातील दोन समन्वयका सह एक इसम १० हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकल्याने पंचायत समितीच्या आवारात एकच चर्चा रंगली होती. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २/११/२०२२ रोजी दीड वाजेच्या सुमारास स्वयंरोजगार उभारणी करीता तालुक्यातील बचतगटांना गट निधी, कर्ज वितरण, पतपुरवठा करणे कामी पंचायत समितीच्या संबंधित विभागातील कर्मचारी प्रमोद बाळासाहेब पाटोळे वय ३७ तालुका अभियान व्यवस्थापक कंत्राटी कामगार रा. बोरगाव, विलास मोतीराम खटके ३८ प्रभाग समन्वयक हट्टी, यादव मोतीराम गांगुर्डे ३०. खाजगी इसम रा. चिंचपाडा यांना रंगेहाथ पकडले आहे. (Three people in arrested by ACB operation in Surgana Nashik Bribe Crime News)

Bribe crime
Nashik : रंगरंगोटी केलेल्या दुभाजकाला पुन्हा तडे; वाहनांची वारंवार धडक

नाशिक एसीबीने दिलेल्या माहितीनुसार उमेद अभियान अंतर्गत गेल्या सहा महिन्यात केलेल्या कामाचे मानधन देण्याकामी १० हजाराची मागणी केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. एसीबीने सापळा रचून पवार अमृततुल्य या चहाच्या टपरीवर तिघांनी १० हजाराची लाच स्विकारली त्याच वेळी एसीबीच्या पथकाने या तिघांना रंगेहाथ पकडले. या प्रसंगी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सबंधित विभागाचे सापळा अधिकारी

पोलीस निरीक्षक संदीप सांळुखे, पोलीस हवालदार नितीन कराड, पोलीस नाईक प्रभाकर गवळी, प्रविण महाजन,संतोष गांगुर्डे, विवेक देवरे यांनी पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

Bribe crime
Breaking News : धुळ्याहून शिरपूरकडे जाणारा ट्रक पुलावरुन तापी नदीत कोसळला; चालकाचा शोध सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.