Nashik Accident News : नाशिक मध्ये पुन्हा एक अपघात! 1 विद्यार्थी जागीच ठार

Accident News
Accident Newsesakal
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

जागोजागी होणारे हे अपघात चालकाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक नियम न पाळल्यामुळे नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचे दिसून येते. (Three school children met a serious accident while going to class on motorcycle A student died on spot accident Nashik Accident News)

आज सकाळी सातपूर अंबड लिंक रोडवर क्लास साठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तीन विद्यार्थी एका मोटरसायकल (Mh 15 bw 2311) वरून क्लासला जात असताना मोटरसायकल दुभाजकाला धडकून हा अपघात झाला.

सार्थक दामू राहणे वय १६ राहणार सातपूर असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर भावेश केले, योगेश केले हे दोघे जखमी झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सार्थक व त्याचे दोन मित्र असे तिघेजण मोटरसायकल वरून आज सकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान क्लास साठी जात होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident News
Nashik Accident News : समृध्दी महामार्गावर पुन्हा अपघात; कार थेट जाऊन पडली अंडरपासमध्ये
Sarthak Rahane
Sarthak Rahaneesakal

त्यावेळी सातपूर अंबड लिंक रोडवर सार्थक याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकाला जाऊन धडकली.

या अपघातामध्ये सार्थक राहणे हा जागीच ठार झाला. तर योगेश व भावेश हे गंभीर रित्या जखमी असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. तिघेही विद्यार्थी हे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते.

दरम्यान सोमवारी ही सकाळी अशोक स्तंभ येथे 17 वर्षाच्या मुलाचा मोपेड घसरून अपघात झाला होता त्यामुळे मुलांबरोबर पालकांचा निष्काळजीपणा वारंवार समोर येत आहे.

Accident News
Nashik Accident News : नाशिक मध्ये पुन्हा एक अपघात! 1 विद्यार्थी जागीच ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.