Adihat Exhibition : ‘अदिहाट’च्या माध्यमातून आदिवासींच्या कलाकुसरीला मिळाली बाजारपेठ!

आदिवासी विकास आयुक्तालयं, ठक्कर बाजार आणि महामार्ग बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन येथे ‘आदिहाट’ चे उद्‌घाटन
While inaugurating the Adihat exhibition, Tribal Development Commissioner Nayana Gunde along with Managing Director of Tribal Development Corporation Leena Bansod and officials present.
While inaugurating the Adihat exhibition, Tribal Development Commissioner Nayana Gunde along with Managing Director of Tribal Development Corporation Leena Bansod and officials present.esakal
Updated on

नाशिक : आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या कलांचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्यावतीने आदिहाट सुरू झाले.

आदिवासी विकासच्या आयुक्त आयुक्त नयना गुंडे आणि आदिवासी विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या हस्ते ‘अदिहाट’ चे उदघाटन झाले. त्यानंतर ठक्कर बाजार आणि महामार्ग बसस्थानक तसेच नाशिक रोड रेल्वेस्थानक येथे उदघाटन करण्यात आले.

या दोन्ही ठिकाणी नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. (Through Adihat Exhibition tribal handicrafts got market nashik news)

आदिहाट प्रदर्शनाचे उदघाटन करतांना आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे समवेत आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड व उपस्थित अधिकारी.
आदिहाट प्रदर्शनाचे उदघाटन करतांना आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे समवेत आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड व उपस्थित अधिकारी.esakal

आयुक्तालयाच्या ठिकाणी मुंढेगाव आणि वाघेरा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू तसेच त्र्यंबकेश्वर येथील आदिवासी बांधवांनी बनवलेल्या वस्तू आणि औषध विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आदिवासी बांधवांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या वस्तू सर्व ठिकाणी आहेत. मात्र महामार्ग बस स्थानक आणि रेल्वेस्टेशन येथे पारंपरिक धान्य उपलब्ध आहे. सर्वच ठिकाणी उत्साहात उदघाटन झाले.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

While inaugurating the Adihat exhibition, Tribal Development Commissioner Nayana Gunde along with Managing Director of Tribal Development Corporation Leena Bansod and officials present.
Nashik News : वडिलांच्या दशक्रिया निमित्ताने शैक्षणिक संस्थेस दिला एक लाखाचा धनादेश!

आदिवासी बांधवांच्या हातातल्या कलाकुसरीला आदिहाट मधून शहरांच्या ठिकाणी असणारा जाणकार ग्राहक वर्ग मिळणार असून त्यामुळे रोजगार निर्मितीसाठी मदत होणार आहे. उदघाटन होताच लोकांनी खरेदीसाठी केलेली गर्दी बघून समाधान वाटत आहे, असे आदिवासी विकास आयुक्त गुंडे यांनी सांगितले.

यावेळी आदिवासी अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, उपायुक्त अविनाश चव्हाण, सुदर्शन नगरे, वित्त उपसंचालक हितेश विसपुते यांसह बसस्थानक आणि रेल्वेस्थानक येथील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

While inaugurating the Adihat exhibition, Tribal Development Commissioner Nayana Gunde along with Managing Director of Tribal Development Corporation Leena Bansod and officials present.
Nashik Sports Update: बिहार अन् अरुणाचल वरील विजयात नाशिकच्या पवन सानपची प्रभावी गोलंदाजी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.