Nashik News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांना काळे झेंडे दाखविण्याच्या भीतीने पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कालिदास कलामंदिर येथे पवार कार्यक्रमास आले असता कान्हेरीवाडी, गंजमाळ, जिल्हा परिषद, त्र्यंबक नाका, एन. डी. पटेल रोडभागात नागरिकांना एकत्र येण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता.(tight security is maintained by police for fear of raising black flags nashik news)
यात अनेक ठिकाणी नागरिक व पोलिसांत हुज्जत होत होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना देखील रोखल्याने त्यांना आम्ही त्यांचे कार्यकर्ते असल्याची नामुष्की त्यांच्यावर आली. विविध कार्यक्रमानिमित्ताने गुरूवारी (ता.४) उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, अन्न व औषध प्रशासनमंत्री बाबा आत्राम, मदत पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांसह अनेक मंत्री जिल्हा दौऱ्यावर होते.
या दौऱ्यात पवार, भुजबळ यांसह मंत्र्यांना काळे झेंडे दाखविले जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे गुरवारी पोलिसांकडून शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपमुख्यमंत्री पवार यांसह अनेक मंत्री सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कालिदास कलामंदिर येथे आले. त्यावेळी या भागातील सर्व रस्त्यांवर पोलिस तैनात होते.
मंत्री महोदयांचा ताफा जाणाऱ्या रस्त्यावर नागरिकांना एकत्र येण्यापासून रोखले जात होते. जिल्हा परिषद परिसरात, त्र्यंबक रोडवर गर्दीच्या ठिकाणी पोलिस स्वतः जात, गर्दीतील लोकांशी संवाद साधत त्यांना बाजूला करताना दिसत होते. यात अनेक लोकांना समज दिला जात होता.
तुम्ही येथे कशाला थांबले, येथे थांबू नका, असा फतवाच पोलिसांकडून काढण्यात आला होता. याचा फटका जिल्हा परिषदेत येणाऱ्या सर्वसामान्यांना देखील बसत होता. या रस्त्यावर बाहेर लावण्यात आलेली वाहने देखील पोलिसांनी काढून घेण्याचे आदेश दिले. गंजमाळ सिग्नल, एन. डी. पटेल रोडवर देखील चौकाचौकात पोलिसांचा फाटा उभा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.