कंधाणे (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातून तिळवण बारीमार्गे कळवण व देवळा तालुक्यातील गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी झुडपांचा
उपद्रव वाढल्याने रस्त्यात (Road) काटेरी झुडपे की काटेरी झुडूपांत रस्ता? (Tilwan bari road thick with thorn bushes Small big accidents happen frequently nashik news)
असा प्रश्न वाहनधारकांना पडला असून वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने वारंवार लहान मोठे अपघात होत असल्याने तत्काळ रस्त्यावरील झुडपे हटवावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
दिवंगत माजीमंत्री ए.टी.पवार यांच्या प्रयत्नातून बागलाण तालुक्याचा पश्चिम भाग कळवण व देवळा तालुक्यातील गावांना जोडण्यासाठी चौल्हेर किल्ल्या शेजारील डोंगररांगेतील घाट फोडून दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा असून व जवळचा रस्ता असल्याने अतिशय वर्दळीचा आहे.
मात्र रस्त्याला काटेरी झुडूपांनी वेढा घातल्याने व ठिकठिकाणी तीव्र वळण असलेल्या रस्त्यावर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. एकाच वेळी दोन वाहने आल्यावर एका वाहनास जागा देण्यासाठी पुढे मागे करावी लागतात. दुचाकी धारकांना झुडपांच्या फांद्या व काटे टोचतात. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे आणि काटेरी झुडपे चुकविताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
बेसुमार वाढलेल्या फांद्यांमुळे चारचाकी वाहनांना मोठमोठे ओरखडे पडल्यामुळे नुकसान होत असल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. बागलाण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत काटेरी झुडपे व कळवण तालुक्याच्या हद्दीत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
तसेच पाइपलाइनसाठी रस्ता खोदल्यामुळे ठिकठिकाणी चाऱ्या निर्माण झाल्याने वाहनधारकांना प्रवास करणे धोकादायक व त्रासदायक ठरत आहे. चौल्हेर किल्ल्याच्या डोंगररांगांवर पावसाळ्यात संततधार पाऊस सुरु असताना डोंगर कटिंग करून तयार केलेल्या खिंडीत डोंगरावरून सतत छोटे मोठे दगड निसटून कोसळत आहे. त्यामुळे या ठिकाणी दरडी संरक्षक लोखंडी जाळ्या बसवून व घाटात दोन्ही बाजूला कठडे बांधून दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
"तिळवण बारीतून दिवसेंदिवस रहदारी वाढत आहे. सप्तश्रृंगी गड व त्र्यंबकेश्वर येथे पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी जवळचा रस्ता आहे. त्यामुळे रस्त्यावरील झुडपे आणि डोंगरावरून कोसळणारे दगड धोकादायक ठरू शकतात. म्हणून तिळवण ते विसापूर रस्ताची दुरुस्ती करून संरक्षक जाळ्या बसविल्या जाव्यात." - योगराज पाटील, उपसरपंच तिळवण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.