Nashik Onion News : मातीमोल दराने कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ; उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपये दर मिळत होता.
Green shoots of old summer exportable onions stored in the chali of Sanjay Dadaji Sonwane, an onion grower from Ajmer Saundane Saudane Shivara.
Green shoots of old summer exportable onions stored in the chali of Sanjay Dadaji Sonwane, an onion grower from Ajmer Saundane Saudane Shivara.esakal
Updated on

Nashik Onion News : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल साडेपाच हजार रुपये दर मिळत होता. त्यामुळे ‘अच्छे दिन’ आल्याच्या स्वप्नात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आनंद काही काळ द्विगुणित झाला होता.

मात्र ७ डिसेंबरला केंद्र सरकारने शहरी ग्राहकांना अल्पदरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी कांद्यावर तत्काळ निर्बंध लादल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अल्पकाळच टिकला. (Time for farmers to sell onions at lower price nashik news)

रातोरात कांद्याचे भाव कोसळल्याने पहिल्या आठवड्यात तब्बल साडेपाच हजार रुपये क्विंटल दराने विकलेला कांदा पंधरा दिवसांनंतर अवघ्या एक हजार ते दीड हजार रुपये दराने विकण्याची दुर्दैवी वेळ अजमीर सौंदाणे शिवारातील कांदा उत्पादक संजय दादाजी सोनवणे यांच्यावर आली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव म्हणाले, केंद्र शासनाने शहरी ग्राहकांच्या हितासाठी घेतलेल्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बाजार समित्यांचे कामकाज बंद पाडून शेतकरीविरोधी निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध केला.

१२ डिसेंबरला बाजार समित्यांचे कामकाज सुरू होताच दररोज सरासरी चार ते साडेचार हजार क्विंटल कांद्याची होणारी आवक डिसेंबरअखेर घटून पाचशे क्विंटलपर्यंत खाली आली. एकूण ४२ ते ४५ हजार क्विंटलपर्यंत सटाणा व नामपूर या दोन्ही बाजार समित्यांमध्ये साधारणपणे आवक होती. आज मात्र आवक अवघी २०० ते २५० क्विंटल इतकीच आहे.

शेतकऱ्यांकडील चाळीत साठवलेला कांदा जवळपास संपल्यातच जमा आहे. अजमीर सौंदाणे शिवारातील कांदा उत्पादक संजय सोनवणे यांच्या शेतातील चाळीत साठवलेल्या जुन्या उन्हाळी कांद्याची पाहणी केली असता, त्यांच्या निर्यातक्षम कांद्याना हिरवे कोंब फुटल्याचे आढळून आले.

Green shoots of old summer exportable onions stored in the chali of Sanjay Dadaji Sonwane, an onion grower from Ajmer Saundane Saudane Shivara.
Nashik Onion News: मुंगसे बाजारात 4 दिवसात कांद्याची 25 कोटींची उलाढाल! 85 हजार क्विटंलची विक्री

८ डिसेंबरला निर्यातबंदी जाहीर होण्यापूर्वी बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर या दोन्ही बाजार समितींच्या आवारात आठ ते दहा हजार, तर त्यानंतर १२ डिसेंबरला चार हजार क्विंटल आवक होती. मात्र निर्यात बंदीच्या घोषणेमुळे दोन्ही बाजार समित्यांमधील आवक अचानक कमी झाली.

निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक कमी केली. व्यापाऱ्यांनीसुद्धा उन्हाळ कांदा खरेदीत फारसा उत्साह न दाखविल्यामुळे कांदा भावात मोठी घसरण झाली. त्याचा परिणाम आवक घटण्यात झाला आहे.

''संकटकाळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसत, तत्काळ कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी आणि शेतकरी व व्यापाऱ्यांना कांदा विक्रीसाठी नियंत्रणमुक्त करावे.''- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Green shoots of old summer exportable onions stored in the chali of Sanjay Dadaji Sonwane, an onion grower from Ajmer Saundane Saudane Shivara.
Nashik Onion News : मालेगावच्या दक्षिण पट्ट्यातही उन्हाळ कांदा लागवडीची धूम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.