Navratri 2023: गोदाघाट परिसरात टिपऱ्यांचा बाजार सजला! नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी

Navratri 2023
Navratri 2023esakal
Updated on

Navratri 2023 : नाशिककरांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शहरातील देवी मंदिरांमध्ये उत्सवाची तयारी सुरू असताना, दुसरीकडे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांचीदेखील मंडप उभारणीची व सजावटीची लगबग सुरू झाली आहे.

गोदाघाट परिसरातील म्हसोबा पटांगण लगत असलेल्या भाजी बाजार इमारतीच्या पायऱ्याजवळ टिपऱ्यांचा बाजार सजला आहे. टिपऱ्या विक्रेत्यांचे टिपऱ्या रंगकाम जोरात सुरु असून, शंभर टिपऱ्यांचा बंडल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (tiprya bazaar decorated in Godaghat area Heavy preparations for Navratri festival nashik)

दरवर्षीप्रमाणे गोदाघाट परिसरात टिपऱ्यांचा बाजार सजला आहे. यात बहुतांश विक्रेते हिंदी भाषिक असून, टिपऱ्यांसाठी लागणारे लाकूड परजिल्ह्यातून अथवा परराज्यातून आणले जाते.

विक्रेत्यांनी सांगितल्यानुसार हे लाकूड तुतीच्या झाडाचे असून, यापासून तयार केलेल्या टिपऱ्या टिकाऊ असल्याचे या विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दीड ते दोन फुटांच्या लांबीच्या टिपऱ्या कापून त्यांचे साल काढून टाकले जाते.

त्या वाळवून त्यावर रंगकाम करून तसेच चमकीचा कागद लावून आकर्षक टिपऱ्या तयार करण्याचे काम हे विक्रेते करीत आहेत. तयार शंभर टिपऱ्यांचा बंडल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Navratri 2023
Navratri Festival : अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; शिखरांसह परिसरात स्वच्छता मोहीम, दर्शनरांगेत केला बदल

शहरासह जिल्हाभरातून अनेक छोटे मोठे व्यावसायिक टिपऱ्या विक्रीसाठी खरेदी करीत आहेत. यासह सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्तेदेखील या टिपऱ्या खरेदी करण्यासाठी येत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले.

जसंजसे नवरात्रोत्सवाचे दिवस जवळ येत जातील तसतसे या टिपऱ्यांचे भाव अधिक वाढणार असल्याचे या विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मागील वर्षी पेक्षा यंदा रंगांचे व वाहतुकीचा खर्च वाढला असल्याने साहजिकच टिपऱ्यांचे भाव काही प्रमाणात वाढले असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले.

तुतीपासून निर्मिर्ती

तुतीच्या झाडापासून या टिपऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. एका बंडलमध्ये १०० टिपऱ्या असून, ५० जोड तयार होतात. याठिकाणी हे बंडल २०० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एक जोड खरेदी करण्यासाठी २० ते ३० रुपये मोजावे लागत आहेत.

Navratri 2023
Navratri 2023 : नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकुनही करू नका या चूका, देवीच्या क्रोधाचा होईल संसारावर परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.