मनमाड (जि. नाशिक) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त मनमाडकरांतर्फे शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर एकात्मता चौकात राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला. (Tiranga rally caught attention of Manmad citizen Participation of all religion citizens nashik Latest Marathi News)
क्रांती दिनानिमित्त मंगळवारी (ता. ९) ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’, अशा आवेशपूर्ण घोषणा देत आणि मशाल प्रज्वलित करून मनमाड शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. उत्साही वातावरणात निघालेल्या रॅलीत सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग होता. डौलाने तिरंगी ध्वज फडकत होते.
पक्ष संघटना, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या विविध मार्गाने राष्ट्रीय महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून अभिवादन करत मार्गस्थ झालेल्या रॅलीचा समारोप एकात्मता चौकात झाला.
तेथे सामूहिक राष्ट्रगीत झाले. मुख्यधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, शहराध्यक्ष जय फुलवाणी, अशोक परदेशी, प्रभारी निरीक्षक पी. बी. गिते, एकनाथ बोडखे, नारायण पवार, नितीन परदेशी, निळकंठ त्रिभुवन, क्रीडाशिक्षक प्रवीण व्यवहारे, अनिल काकडे, नितीन पाटील, भागीनाथ वडनेरे, स्वाती मगर, सचिन दराडे, रमाकांत मंत्री, अनिल दराडे आदी रॅलीत सहभागी झाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.