Nashik: भारनियमनाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; सहाय्यक अभियंत्याची उर्मट वागणूक, आंदोलनाचा इशारा

Lok Pratidhi in discussion with the power company official
Lok Pratidhi in discussion with the power company officialesakal
Updated on

Nashik : जानोरी येथील एका शेतकऱ्याने भारनियमनाविरोधात वीज उपकेंद्राजवळ मंगळवारी (ता. २९) रात्री आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही गंभीर बाब असतानाही जानोरी येथील सहाय्यक अभियंत्यांनी मोबाईल बंद ठेवून कोणताही प्रतिसाद दिला नाही.

बुधवारी (ता. ३०) स्थानिक पदाधिकारी उपकेंद्रात अधिकाऱ्याची वाट बघत होते. दुपारी एकपर्यंत संबंधित अधिकारी ऑफिसला आले नाही. दुपारी आल्यानंतर पदाधिकाऱ्यांना उर्मट उत्तरे दिली.

याविरोधात संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याची माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा मविप्र संचालक प्रवीण जाधव यांनी दिला आहे. (Tired of load regulation farmer attempts self immolation Assistant Engineer polite behavior warning of agitation Nashik)

जानोरी वीज उपकेंद्रावरून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, रात्री या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कमीत कमी रात्री भारनियमन करू नका, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मंगळवारी रात्री खंडित वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्याने जानोरी उपकेंद्रात जाऊन सहाय्यक अभियंता वडनेरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. संतापलेल्या शेतकऱ्याने तेथेच आत्मदहनाचा प्रयत्न केला.

मात्र, नागरिकांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला. बुधवारी लोकप्रतिनिधी सहाय्यक अभियंता वडनेरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले. दुपारी एकपर्यंत ते कार्यालयात नव्हते.

त्याबाबत ओझर विभागाचे उपकार्यकारी अभियंता संदिप शिंदे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर सहाय्यक अभियंता वडनेरे दुपारी एकला कार्यालयात हजर झाले. झालेल्या प्रकाराबद्दल ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींना समर्पक उत्तरे देण्याऐवजी उर्मटपणे उत्तरे दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Lok Pratidhi in discussion with the power company official
NMC News: सातवा वेतन आयोगाच्या हप्त्यांवर गंडांतर! लेखा विभागाची कसरत

याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याची माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा प्रवीण जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे, राजेंद्र ढगे, जानोरी उपसरपंच काठे, राजकुमार वाघ, निखिल जाधव, बाकीराव मौले, मनोज मोगरे, प्रभाकर जाधव आदींसह परिसरातील गावांनी दिला आहे.

"परिसरात बिबट्याचा वावर असल्याने रात्री भारनियमन करू नये, अशी अपेक्षा आहे. स्थानिक शेतकऱ्याने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. संतप्त शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेलो असता, दुपारी एकपर्यंत अधिकारी कार्यालयात हजर नव्हते, ही शोकांतिका आहे." -प्रवीण जाधव, मविप्र संचालक

"एका संतप्त शेतकऱ्याने वीज उपकेंद्रात येऊन आत्मदहण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रकार माहीत होऊनही संबंधित अधिकारी कार्यालयात हजर राहत नाही. यामुळे अधिकाऱ्याला कोणाचा धाक आहे की नाही, हा प्रश्न तयार होतो. या अधिकाऱ्याचा आम्ही निषेध करतो. अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करतो."- हर्शल काठे, उपसरपंच, जानोरी

Lok Pratidhi in discussion with the power company official
Rain Crop Damage: वर्षभरानंतरही नुकसान भरपाईची प्रतीक्षाच! गत सप्टेंबरमधील नुकसानीच्या 50 कोटींची थकबाकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()