Nashik News : सावकाराच्या जाचाला कंटाळून भावांनी घेतले विष; एकाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू

Ravindra Kamble
Ravindra Kambleesakal
Updated on

नाशिक : नाशिक रोड परिसरातील भालेराव मळा परिसरात राहणाऱ्या दोघा भावांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विषप्राशन केल्याची घटना रविवारी (ता. ५) रात्री घडली.

यात एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवींद्र लक्ष्मण कांबळे (३७, रा. भालेराव मळा) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी रास्तारो को केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

गेल्या दीड महिन्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना शहरात सातत्याने घडत असून, अशा घटनांतून आत्तापर्यंत सहा जणांनी आत्महत्या केल्या आहेत. (Tired of moneylenders questioning brother took poison One dead another undergoing treatment Nashik Road incident angry relatives blockaway Nashik News)

Ravindra Kamble
Nashik News | सत्यजित तांबेंना भेटण्याचा निरोप आला, आम्ही भेटणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खासगी सावकारीसंदर्भातील प्रश्न शहरात सातत्याने चर्चिले जात असून, काही महिन्यांपासून या जाचाविरोधात आत्तापर्यंत सहा ते सात गुन्हे दाखल झाले आहेत.

इंदिरानगर परिसरातील पाथर्डी फाटा येथे राहणाऱ्या नवदांपत्य जगताप यांनी तसेच गेल्या आठवड्यात सातपूरमध्ये शिरोडे कुटुंबातील बापलेकांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. नाशिक रोडला रविवारी (ता. ५) घडलेल्या घटनेने नाशिकमध्ये सावकारीचा फास दिवसेंदिवस घट्ट होत चालल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

Ravindra Kamble
Nashik News : धक्कादायक! सावकाराच्या जाचाला कंटाळून दोघांनी केले विष प्राशन

रवींद्र लक्ष्मण कांबळे याने लिहिलेल्या सुसाइट नोटमध्ये सावकाराच्या छळाला कंटाळून विषप्राशन करत असल्याचे म्हटले आहे. नोटमधील तपशिलानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सावकाराने दोघा भावांना बेदम मारहाण केल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. संतप्त नातेवाइकांनी बिटको महाविद्यालयासमोर रास्ता रोको केले.

दरम्यान, मृतदेह पोलिस संरक्षणात जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, विजय पगारे, राजू पाचोरकर आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिस तपास करीत होते.

कांबळे बंधूंची सुसाइड नोट

कांबळे बंधूंकडे सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये त्यांना सावकाराने मारहाण केल्याचे तसेच त्यांच्यावर ४० लाखांचे कर्ज असल्याची नोंद आहे. कांबळे बंधूंनी घरातील सोने, गाडी विकत तसेच नातेवाइकांकडून उसनवार पैसे घेत सावकराचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला. परंतु सावकाराकडून त्यांच्यावर कर्ज असल्याचे दाखविण्यात आल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

Ravindra Kamble
Jalgaon News : यात्रेकरूंच्या बसला ओडीसा बॉर्डरजवळ अपघात; जिल्ह्यातील 31 यात्रेकरूंचा समावेश

महिनाभरातील तिसरी घटना

नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये दोन महिन्यांमध्ये खासगी सावकाराविरोधातील सात गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये पाच जणांनी आत्महत्या केली आहे. १८ डिसेंबर २०२२ ला पाथर्डी फाटा येथील जगताप या नवतरुण दांपत्याने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेतला.

२९ जानेवारीला दुपारी सातपूर परिसरात फळविक्रेत्या शिरुडे व त्यांच्या दोन मुलांनी राहत्या घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्या. पोलिसांनी अवैध सावकारी करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल केले असून, तपास सुरू आहे. आतापर्यंत अनेकांच्या घरांवर छापे टाकून उपनिबंधक कार्यालय व पोलिसांनी संशयास्पद कागदपत्रे जप्त करीत कारवाई सुरू केली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सावकारी जाचाविरोधात तक्रार करण्याचे आवाहन त्रस्त नागरिकांना केले आहे.

Ravindra Kamble
Pan Card News : 13 कोटी लोकांना मोठा धक्का! पॅन कार्ड धारकांसाठी सरकारने जारी केली अधिसूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.