Anganwadi Recruitment : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर दोन या कार्यालयांतर्गत रिक्त असलेल्या अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावेत, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एम. एस. भोये यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
सिन्नर तालुक्यातील अंगणवाडी मदतनीसांच्या ९६ रिक्त जागा यातून भरल्या जाणार आहेत. (To fill 96 posts of Anganwadi Helpers Recruitment process in Sinnar taluka from this date nashik news)
या पदासाठीची किमान शैक्षणिक अर्हता बारावी उत्तीर्ण आहे. वय १८ वर्ष ते ३५ वर्ष दरम्यान असून विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहणार आहे.
उमेदवार हा त्याच महसूली गावाचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजू महिला उमेदवारांनी २१ जून ते ५ जुलै या दरम्यान कार्यालयीन दिवशी वेळेत अर्ज करावे असे भोये यांनी सांगितले.
भरती प्रक्रियेतील गावे व कंसात पदसंख्या अशी : जोगलटेंभी, चाव्हणमळा, सोनगिरी, ब्राम्हणवाडे १,खोरे, वडझिरे,क्रेशर,वाघमुंडीदरा, पिंपळे, तमाकरवाडी, ठाणगाव ५, भलेवाडी, आडवाडी १, आडवाडी २, पाडळी, ठानगाव २,
पांढूर्ली ३, शिवडे १, म्हसाळवाडी, आगासखींड १,आगासखिंड २, बेलू, वडगाव पिंगळा १, भोरमळा, वडगावशिंदेमळा, सोनांबे ३, बेंदवाडी, बोडकेवस्ती, ओढेवाडीगावठा, हरसुले, कोनांबे १, डुबेरे २, अण्णाचामळा,
धोंडविरनगर, पाटोळे, खताळवस्ती, रामनगर, खळवाडी, मुळमापारवाडी, लोणारवाडी १, कुंदेवाडी १, पाटपिंप्री १, घांगाळवाडी, पाटाचीवस्ती, के पा नगर, बारागावपिंप्री २, सुळेवाडी १, गुळवंच २, गुळवंच ४,निमगाव १,फत्तेपूर,
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मऱ्हळ खुर्द , फुलेनगर, वल्हेवाडी, भोकानी १, वावी १,वावी ३, दुशिंगपुर, पिंपरवाडी, धुमाळवस्ती, पांगरी खु. मिठसागरे २, पाथरे बु , सायाळे, मलढोण, नारोडे वस्ती (देवपूरची), थोरातवस्ती, शहा २, उजनी २, कणकुसेवस्ती, झापेवाडी, सोमठाने १ सोमठाणे २, शिवाचामळा, वाडांगळी १, वडांगळी ३,
किर्तांगळी, पिंपळगाव, कोमलवाडी, फर्दापूर, जयायोगेश्र्वर नगर, स्वामीसमर्थनगर, केदरपुर, धारणगाव, देवपूरफाटा, चौफुली, सोनेवाडी, कागदरा, लावरेवाडी, आव्हाडवस्ती, बोचरेमळा,मानोरी २ , चास १,नांदूरशिंगोटे २ या अंगणवाडी केंद्रातील एकूण ९६ रिक्त मदतनीस या पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
अर्जदार उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.