नाशिकमध्ये उल्‍कावर्षाव पाहण्याची आज संधी

मध्यरात्री थरार; ताशी दीडशे ते दोनशे इतके राहणार उल्‍कांचे प्रमाण
नाशिकमध्ये उल्‍कावर्षाव पाहण्याची आज संधी
Updated on

नाशिक : नववर्षाचे स्‍वागत करत असताना खगोलप्रेमींसाठी(Astronomy) पर्वणी ठरणार आहे. उद्या (ता.३) मध्यरात्री पहिला क्‍वाड्रांटिड उल्‍कावर्षाव (मीटिओर शॉवर) चा थरार अनुभवण्याची संधी उपलब्‍ध असणार आहे. पहाटे दोन ते चारच्‍या दरम्‍यान उल्कांचे प्रमाण ताशी दीडशे ते दोनशे इतके राहणार असल्याचा अंदाज अमेरिकेच्या ''नासा''(NASA) संस्थेने वर्तविला आहे.क्वाड्रांटिड साधारणपणे डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान सक्रिय असतात. ३, ४ जानेवारीदरम्‍यान शिखरावर असते. इतर उल्कावर्षावांच्या विपरीत हे त्यांच्या शिखरावर सुमारे दोन दिवस राहतात. क्वाड्रंटिड्सचा शिखर कालावधी फक्त काही तास टिकतो. उद्या (ता.३) मध्यरात्री अर्थात ४ जानेवारीच्‍या पहाटे दोन ते चार या दरम्यान उल्कापात शिखरांवर राहतील.

नाशिकमध्ये उल्‍कावर्षाव पाहण्याची आज संधी
नाशिक : वडिलांचे खोटे LC देणाऱ्या युवतीला मिळाले जातप्रमाणपत्र

उल्कावर्षाव ही निसर्गाची एक विलोभनीय देणगी आहे. धूमकेतू सूर्यप्रदक्षिणा करताना मागे वायू आणि धूळ सोडत जातो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करताना या धुळीच्या मार्गातून जाते. तेव्हा ही धूळ (खडक, धातू, वायू, बर्फ आदी) पृथ्वीच्या गुरुत्वामुळे आकर्षित होऊन जमिनीकडे खेचली जाते. या उल्का सरासरी ताशी ५० हजार किलोमीटरच्या गतीने वातावरणातून प्रवेश करतात. पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर हे खडक घर्षणामुळे जळायला सुरुवात होते आणि सुंदर दृश्य खगोलप्रेमींना बघायला मिळते. बहुतेक उल्का या आकाशात जळून जातात. मात्र, क्वाड्रांटिड उल्कावर्षावाचा स्रोत हा २००३ ए-१ नावाचा लघुग्रह आहे. दरवर्षी या लघुग्रहाचे कण २६ डिसेंबर ते १६ जानेवारी या काळात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. २-४ जानेवारीच्या रात्री त्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. लघुग्रहाचे कण हे धूमकेतूच्या शेपटीतील धूलिकणांपेक्षा आकाराने मोठे असल्यामुळे या उल्का अधिक तेजस्वी दिसतात.

शहरापासून दूरवर चांगले

जिथे कृत्रिम प्रकाश नसेल, अशा शहरापासून दुरवरच्‍या ठिकाणी निरीक्षण केलेले उत्तम ठरु शकते. शहरातून उल्का निरीक्षण करण्यासाठी उंच इमारतीवर जिथून चारही दिशेने क्षितिज दिसेल अशा ठिकाणी गेलेले फायदेशीर ठरु शकते.

नाशिकमध्ये उल्‍कावर्षाव पाहण्याची आज संधी
23 वर्षीय युवतीला मोबाईलवरुन मेसेज व धमकी देणाऱ्या युवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

साध्या डोळ्यांनीही शक्य

उद्या (ता.३) मध्यरात्री होणारा हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी निरीक्षण करता येईल. अनेकवेळा चंद्रप्रकाशाचा अडथळा असल्यामुळे उल्का दिसण्याचे प्रमाण कमी असते. परंतु यावेळी रविवारी (ता.२) पौष अमावस्या असल्याने चंद्रप्रकाशाची अडथळा नसेल. ढगाळ वातावरण नसल्‍यास ही खगोलप्रेमींसाठी आणि हौशींसाठी चांगली संधी ठरेल.

उल्का दिसणे ही जितकी सुंदर बाब आहे, तितकेच उल्का निरीक्षण करणे अवघड आहे. एका दिशेने पाहिल्यास उल्का दिसत नाही. उभे राहून उल्का पाहणे कठीण आहे. पाठिवर झोपून किंवा आरामखुर्चीवरून पाहणे सोयीचे आहे. उल्का निरीक्षण साध्या डोळ्याने सोयीचे आहे. मध्यरात्रीनंतर उत्तर दिशेला उल्कावर्षाव पाहता येईल.

-सुदर्शन गुप्ता, खगोल अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.